
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने (Swabhimani Farmers Association) एकरकमी एफआरपीसह अधिकचे 350 रुपये प्रतिटन पहिली उचल द्यावी आणि गतवर्षीच्या ऊसाची (sugarcane) एफआरपी अधिक 200 रुपये तातडीने जमा करावेत याबाबत आक्रमक भूमिका (aggressive stance) घेतली आहे. दरम्यान याआधी देखील स्वाभिमानीने शिरोळ तालुक्यातील(Shirol taluka) तीन कारखान्यांची ऊसतोड रोखली होती. त्यानंतर आता पुन्हा पन्हाळा तालुक्यातही (Panhala taluka) स्वाभिमानीने ऊसतोड रोखत आक्रमक इरादा स्पष्ट केला आहे.
Prathamesh Parab: ‘टाईमपास’ फेम दगडूला मिळाली खऱ्या आयुष्यातील प्राजू; पाहा PHOTO
आसुर्ले-पोर्ले येथील दालमिया भारत शुगर या खासगी साखर कारखान्याने यंदा गळीत हंगामाची पहिली उचल 3 हजार 75 रुपये जाहीर केली. आणि या गळीत हंगामास काल सुरुवात केली. परंतु स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी ही उचल मान्य नसल्याचे सांगत शिरोळ तालुक्यातील कारखान्याची ऊस वाहतूक रोखली. कार्यकर्त्यांनी कारखाना गेटसमोर ट्रॅक्टर येताच ते परत पाठवले.
महिला आणि पुरुष क्रिकेटर्सना मिळणार समान मानधन, जय शाह यांची घोषणा
जोपर्यंत पहिल्या उचलीबाबत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत कोणीही ऊस तोड घेऊ नये असे आवाहन स्वाभिमानी संघटनेनं केलं आहे. तसेच यावेळी तालुका युवा अध्यक्ष विक्रम पाटील यांनी जोपर्यंत स्वाभिमानी आणि दालमिया प्रशासन यांच्या एफआरपीबाबत योग्य निर्णय होत नाही तोपर्यंत कोणी तोडणी स्वीकारू नये, असे आवाहन केलं आहे.
‘या’ योजेनंतर्गत गाय गोठा बांधण्यासाठी मिळणार ८० लाख रुपये अनुदान
दरम्यान दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी जयसिंगपूरमध्ये झालेल्या ऊस परिषदेत एकरकमी एफआरपीसह व जादा 350 रुपये दिल्याशिवाय ऊसाच्या कांडाला हात लावू देणार नाही, असा इशारा दिला होता. दरम्यान या मागणीनंतर स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असून आतापर्यंत शिरोळ तालुक्यातील तिन्ही कारखान्यांची ऊस वाहतूक बंद पाडण्यात आली आहे.
शेळी पालनाचा विचार करताय?, आता १० शेळ्या पाळण्यासाठी मिळणार ४ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज