मुंबई : आपण पहिल्यापासून ऐकत आलोय की आंबा हा फळांचा राजा आहे. आणि आंब्यामधला महाराजा म्हणून हापूस आंब्याला (hafus mango) ओळखल जात. दरम्यान आता याच महाराजा हापूस आंब्याची एक आनंददायक बातमी समोर आली आहे .जगप्रसिद्ध असलेल्या या कोकणातील (kokan)हापूस आंब्याची (Hapus Mango) आता वर्षभर चव चाखता येणार आहे. याच कारण म्हणजे हा आंबा कोल्ड स्टोरेजमध्ये (cold storage) वर्षभर टिकणार आहे.
Ambadas Danve: याकूब मेमनच्या कबरीचे उद्दातीकरण हे खूपच दुर्दैवी, अंबादास दानवेंनी दिली प्रतिक्रिया
सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील सावंतवाडी जवळील नेमळे गावात गुरुप्रसाद नाईक (Guruprasad Naik) हे मोठे आंबा व्यावसायिक आहेत .दरम्यान नाईक यांनी कोल्ड स्टोरेजमध्ये नैसर्गिकरित्या पिकलेलल्या आंब्याची साठवणूक केली आहे. या प्रक्रियेसाठी नाईक यांनी गेली दोन वर्ष प्रयत्न केले असून या प्रयत्नांना यश आले. त्यामुळे आता कोकणातील हा हापूस आंबा वर्षभर खाता येणार आहे. गुरुप्रसाद नाईक यांनी सांगितले की, हा आंबा आता एक डझनाला किमान 1 हजार 200 रुपयांचा दर मिळत असल्याने चांगला फायदा होत आहे.
Amit Shaha: मुंबईत दौऱ्यावेळी अमित शहांच्या सुरक्षेत ‘ही’ मोठी चूक, धक्कादायक कारण आल समोर
लाडक्या बाप्पाला हापूस आंब्याचा नैवद्य
विशेष म्हणजे हापूस आंबा साठवून ठेवल्यानंतर देखील त्याची चव आणि त्याच्या रंगातदेखील कोणताही फरक पडलेला दिसत नाही. गुरुप्रसाद नाईक यांनी ऐन गणपती सणाला आंबा विक्री गणेशभक्तांना उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे गणेशभक्त आनंदी झाले आहेत. विशेष म्हणजे गणरायाचं आगमन झाल्याने हजारो चाकरमानी या सणाला कोकणात दाखल झाले आहेत. कोकणात आपल्या लाडक्या बाप्पाला गणेश चतुर्थीत फळांचा राजा असलेला हापूस आंबा नैवद्य म्हणून ठेवला जात आहे. तर काही जण आंबा ज्युस, आंब्याचं रायत बनवून त्याची चव चाखत आहेत.
Sara Ali Khan: चक्क हेअरस्टायलिस्टसोबत सारा अली खानने केला जबरदस्त डान्स, व्हिडिओ पाहून येईल हसू
शासनाने सबसीडी द्यावी
फेबुवारी, मार्च, एप्रिल आणि मे महिन्यात कोकणात हापूस आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु सिझन संपला की हा आंबा मिळत नसे. दरम्यान आता कोल्ड स्टोरेज सिस्टीम उपलब्ध झाल्याने हा आंबा उपलब्ध होत आहे. परंतु मोठ्या प्रमाणात लाईट बिल येत असल्याने हे परवडणारे नाही. तसेच बऱ्याचवेळा लाईट गेल्यास जनरेटरचा वापर करावा लागतोय. म्हणून शासनाने सबसीडी दिल्यास आणि सुविधा उपलब्ध करून दिल्यास हा प्रयोग कोकणात नक्की यशस्वी होईल अस गुरुप्रसाद नाईक म्हणाले.
‘या’ पद्धतीने करा कोंबडखताचा वापर, पीक येईल जोमात; वाचा सविस्तर