पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी एक नवी संकल्पना मांडली आहे. विशेष म्हणजे ही ‘एक राष्ट्र, एक पोलीस वर्दी’ ची (One Nation, One Police Uniform) संकल्पना आहे. फरिदाबाद येथील सुरजकुंड परिसरात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shaha) यांच्या अध्यक्षतेखाली गृह मंत्र्यांचे चिंतन शिबिर सुरू होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित केले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी या संकल्पनेच्या पुर्ततेच्या शक्यता संबंधी चर्चा करण्याचे देखील सूचवले. तसेच पंतप्रधान मोदींनी केंद्रीय तपास यंत्रणांना (Central Investigation Agencies) राज्यांनी सहकार्य करण्याचे आवाहन देखील केले. तसेच अनेक राज्यांमध्ये केंद्रीय तपास यंत्रणांना तपास करण्यापूर्वी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागत असल्याचे सूचक आवाहन मोदींनी केले.
संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी गौतमी पाटील नक्की आहे तरी कोण? वाचा सविस्तर
देशवासियांच्या मनात एनडीआरएफ बद्दल सन्मान –
पुढे बोलताना पंतप्रधान म्हणाले की, अनेकदा केंद्रीय तपास यंत्रणांना विविध राज्यांमध्ये एकत्रित तपास करावा लागतो. फक्त राज्यात आणि देशातच नाही तर दुसऱ्या देशांमध्ये देखील जावे लागते. म्हणून प्रत्येक राज्यांचे दायित्व आहे की, राज्यांची अथवा केंद्राची एजेन्सी, सर्व एजेन्सींना एक दुसऱ्यांना सहकार्य करणे आवश्यक आहे. इतकंच नाही तर सायबर क्राईम अथवा ड्रोन टेक्नोलॉजीचा हत्यार, अंमली पदार्थांच्या तस्करीत केला जाणारा वापर रोखण्यासाठी आपल्याला नवीन टेक्नॉलॉजीवर काम करावे लागेल.
Kili Paul: किली पॉल गातोय ‘तुझ मे रब दिखता है…’; नक्की कोणाच्या प्रेमात पडला?
महत्वाची बाब म्हणजे पंतप्रधान मोदींनी स्मार्ट टेक्नोलॉजीमुळे कायदा-सुव्यवस्था स्मार्ट बनवता येईल, असा विश्वास व्यक्त केला. पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशवासियांच्या मनात एनडीआरएफ बद्दल सन्मान आहे. म्हणून आपत्तीच्या वेळी एनडीआरएफ-एसडीआरएफच्या टीम पोहचताच क्षणी नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान बघायला मिळते. त्यामुळे केंद्रीय यंत्रणांना सहकार्य करण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले आहे.
देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतकाळ आपल्या समोर आहे –
देशवासियांबद्दल आपले दायित्व आहे त्यामुळे राज्यांनी एकमेकांपासून शिकावे, प्रेरणा घ्यावी, देशाच्या भल्यासाठी कार्यरत राहावे, हीच संविधानाची भावना असावी अस पंतप्रधान म्हणाले. विशेष म्हणजे प्रत्येक राज्यांनी एकमेकांचे चांगले काम आत्मसात करत देशासाठी मिळून काम केले पाहिजे. त्यामुळेच देशाच्या अंतर्गत सुरक्षेसंबंधी हे चिंतन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात आठ राज्याचे मुख्यमंत्री तसेच १६ राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री या कार्यक्रमात सहभागी झाले होते.
मोठी बातमी! दूध संघांची पुण्यात बैठक, दुधाचे दर वाढण्याची शक्यता
पुढे बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, देशात उत्सवाचे वातावरण आहे. इतकंच नाही तर देशवासियांनी ओणम, दसरा, दुर्गापूजा, दिवाळीसह अनेक उत्सव शांती तसेच सौहार्दपूर्ण वातावरणात साजरे केले आहेत. तसेच आता छठ पूजेसह इतर सण आहेत. त्यामुळे विविध आव्हानांमध्ये देशाच्या एकतेचे सशक्तीकरण आपल्या सर्वांच्या तयारीचे प्रतिबिंब असल्याचं देखील पंतप्रधान मोदी म्हणाले. विशेष म्हणजे देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतकाळ आपल्या समोर आहे. त्यामुळे आता येणाऱ्या २५ वर्षांमध्ये देशात एक अमृत पीढीच्या निर्माणाचा हा काळ आहे. आणि ही अमृत पीढी पंच प्राणांच्या संकल्पांना धारण करीत निर्माण होईल असं देखील पंतप्रधान मोदी म्हणाले.
Kili Paul: किली पॉल गातोय ‘तुझ मे रब दिखता है…’; नक्की कोणाच्या प्रेमात पडला?