दिवाळी म्हणल की फटाके आलेच. फटाक्यांमुळे (fireworks) मोठ्या प्रमाणात ध्वनी आणि वायू प्रदूषण (polution) होते. दरम्यान महाराष्ट्र (Maharashtra) प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि ‘आवाज’ फाउंडेशनच्या वतीने आवाज करणाऱ्या फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण टाळण्यासाठी नुकतीच त्यांची चाचणी करण्यात आली. महत्वाची बाब म्हणजे या चाचणीमध्ये सर्व फटाके उत्तीर्ण झाले आहेत. तसेच फटाके योग्य डेसिबलमध्ये (decibels) आहेत. म्हणून यंदाच्या वर्षी दिवाळीतील (Diwali) फटाक्यांचा आवाज नियंत्रणात राहणार आहे. इतकंच नाही तर सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसार हरित फटाक्यांवर कंपन्या क्यूआर कोड लावत नसल्याचेही पाहायला मिळाले.
बाबो! तब्बल १० कोटींचा म्हैस रेडा, ‘ही’ आहेत त्याची वैशिष्ट्ये
यंदा फटाक्यांच्या 16 प्रकारांची चेंबूर येथील आरसीएफ मैदानात चाचणी घेतली गेली. यामध्ये सनी फायरवर्क्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा ‘झिरो अवर’ फटाक्याची 114 डेसिबल आवाजाची मर्यादा नोंदवली गेली. तसेच राजू कन्ना कंपनीच्या ‘क्लासिक बॉम्ब ग्रीन’ या फटाक्याच्या आवाजाची मर्यादा 114 डेसिबलपर्यंत पोहोचली. दरम्यान ब्लॉक बस्टर 60 मल्टी कॉ. कंपनीच्या फटाक्यांचा 112.6 डेसिबलपर्यंत आवाज पोहोचला. तसेच तेज फायरवर्क्सच्या कमांडो उत्पादनात 110.9डेसिबल आवाजाची मर्यादा नोंदवली गेली.
राजू कन्ना फायरवर्क फॅक्टरी या कंपनीच्या डबल धमाका फटाक्यांची 110.9 डेसिबल आवाजाच्या मर्यादेची नोंद झाली आहे. मात्र या फटाक्यांवर क्यूआर कोड नव्हता. इतकंच नाही तर मनोज फायर वर्क्स कंपनीच्या रेनबॉ 120 मल्टी कोलॉ फटाक्यामुळे 110.1 डेसिबल आवाजाची मर्यादा आढळली; परंतु क्यूआर कोड उत्पादनांवर छापलेला नव्हता.
चक्क इंजिनीअरची नोकरी सोडून पाळल्या गायी,आता महिन्याला कमवतोय लाखो रुपये; वाचा सविस्तर
ही आहेत क्यूआर कोड नसलेली फटाके
रेनबो 120 मल्टिकलर, डबल धमाका, युनिव्हर्सल हिरो, टीम टीम डेल्युक्स फ्लॉवर, डॉलर व्हील, इलेक्ट्रिक नावाची सुरसुरी, साईबाबा सुरसुरी, मर्क्युरी अचिलिस आणि ब्लॉक बस्टर 60 मल्टी कॉ फटाका.
मोठी बातमी! अमिताभ बच्चन यांचा अपघात; पायाची नस कापली…
2008 पासून ‘आवाज’ संस्थेने फटाक्यांच्या चाचण्या सुरू केल्या आहेत. मग यामध्ये फटाक्यांची आवाज मर्यादा 120 डेसिबलच्या आत असली तरच त्यास परवानगी देणे योग्य समजण्यात आले आहे. परंतु याआधी ती निर्धारित मर्यादेच्या पलीकडे जात होती. त्यामुळे 14 वर्षांत प्रथमच सर्व फटाके 120 च्या परवानगीयोग्य डेसिबल मर्यादेत आले आहेत. मात्र ज्या फटाक्यांवर क्यूआर कोड नाही त्या फटाक्यांवर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्या संदर्भात कारवाई व्हावी. नागरिकांमध्ये फटाक्यांच्या वापराबाबत बऱ्याच प्रमाणात जनजागृती झाली आहे. त्यामुळे यावर्षी दिवाळीला सर्वच फटाक्यांच्या उत्पादनामध्ये आवाजाची मर्यादा पाळली गेली आहे. इतकंच नाही तर एकाही फटाक्याच्या चाचणीत आवाजाची मर्यादा ओलांडली गेली नाही.