मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) राज्य सरकारच्या वर्ग तीनमधील लिपिक पदांची भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहेत.काल बुधवारी (ता. २१) मंत्रीमंडळाची बैठक (Cabinet meeting) झाली. दरम्यान या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून राज्यातील लाखो स्पर्धा परीक्षेच्या (competitive examination) विद्यार्थ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. आता सर्वच परीक्षा एमपीएससीच्या कार्यकक्षेत घेतल्या जाव्यात, यासाठी पाठपुरावा करणार आहेत.
BJP: “…तर ठाकरे सरकार कधीच कोसळलं नसतं”; भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा
लिपिक पद हे वर्ग तीनचे पद असले तरी हे पद महत्त्वाचे आहे. त्यामुळे अनेक विद्यार्थी या पदाची विशेष तयारी करतात. याआधी राज्य सरकारकडून वर्ग तीन पदांची भरती प्रक्रिया खासगी कंपन्यांकडून राबविली जात असल्याने भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच अनेक विद्यार्थ्यांचे विविध विभागाच्या भरती प्रक्रियेमध्ये भ्रष्टाचार झाल्याने नुकसान झाले आहे. म्हणून याला विरोध करण्यासाठी विद्यार्थी आणि विद्यार्थी संघटनांकडून भरती प्रक्रिया राबविण्यासाठी एमपीएससीची निवड करण्याची मागणी सातत्याने केली जात होती.
शेतकरी झाले चिंतामुक्त, सरकारने केला शेतजमीन खरेदी-विक्रीमध्ये मोठा बदल
तसेच भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता यावी, यासाठी सर्व पदांची पदभरती एमपीएससीकडे देण्यात यावी, तसेच सरकारने प्रायोगिक तत्त्वावर लिपिक पदांची परीक्षा एमपीएससीकडे देण्यात यावी, यासाठी १० ऑक्टोबर २०२० रोजी निर्णय झाला होता, परंतु विविध कारणांनी दिरंगाई होत होती. दरम्यान आज अखेर या मागणीची दखल घेत मंत्रीमंडळाच्या बैठकीत वर्ग तीनमधील लिपिक पदांची भरती प्रक्रिया एमपीएससीमार्फत राबविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारकडून सांगण्यात आले.
15 ऑक्टोबरपासून सुरू होणार ऊस गाळप हंगाम,यंदा 3,050 रुपये एफआरपी