
आपण पाहतोय की,अनेक राज्यांमध्ये खरीप (Kharip Season) आणि रब्बी हंगामात (Rabi Season) मका या (Maize) पिकची पेरणी मोठ्या प्रमाणात केली जाते. परंतु सध्याच्या काळात मका पिकावर (maize crop) कीड आणि तणाचा (weeds) मोठा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. मका पिकाची किडीमुळे (the insect) आणि ताणामुळे वाढ खुंटते. यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होताना दिसत आहे. खरतर मका पिकाची लागवड ही दुग्धव्यवसायिकांसाठी गरजेचे पीक मानले जाते.
मात्र मका पिकावर गेल्या काही वर्षांपासून किडीचा आणि ताणाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊ लागला आहे. दरम्यान मक्यातील तण खुरपून काढणे हे शेतकऱ्यांना परवडणारे नाही. याच कारणामुळे शेतकरी बऱ्याचवेळा तणावर औषध मारत असतात. पण परिणामी काही वेळा औषध मारूनही मक्यातील तण जात नाही. म्हणून शेतकरी नाईलाजाने दोन वेळा तणनाशकांची फवारणी करतात. परंतु यामुळे शेतकऱ्यांचा पैसा तर वाया जातोच पण वेळही वाया जात असतो. इतकंच नाही तर तणांच्या बिया मक्यात मिसळल्याने पिकाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो.
चक्क माकडाने भरल्या डोळ्यांनी लावली अंत्ययात्रेला हजेरी, सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल
याचा दुष्परिणाम असा की ,शेवटी पिकाचे मूल्य कमी होते. तणांच्या बियांमुळे पिकाचा कस कमी होतो. यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित असलेले उत्पन्न मिळत नाही. मका उत्पादनात तणांना अजूनही गंभीर आर्थिक समस्या म्हणून पाहिले जाते. दरम्यान बाजारात मका पिकातील तणनाशकासाठी नवीन औषध आले आहे. इफको (IFFCO) एमसीने ‘युटोरी’ (Utori) नावाचे हे औषध शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून दिले आहे. विशेष म्हणजे हे औषध मक्यातील तणाला रामबाण उपाय ठरत आहे.
T20 World Cup: सुपर 12 चा टप्पा आजपासून सुरू, टीम इंडिया कधी आणि कोणत्या संघाशी भिडणार? वाचा सविस्तर