आपण प्रत्येकजण लसणाचा (garlic) उपयोग भाजीला फोडणी देण्यासाठी करतो. लसणामुळे भाजीची चव वाढते. भाजीची ग्रीव्ही किंवा चटणी बनवण्यासाठी लसणाचा उपयोग होतो. लसणाला एवढी किंमत असताना त्याला कवडीमोल बाजारभाव (market price) मिळण्याची शक्यता आहे. कारण महाराष्ट्रात (Maharashtra) कांद्यापाठोपाठ आता लसणाचेही दर कोसळण्याची शक्यता आहे. लसणाचे दर कोसळण्याचे कारण म्हणजे भरपूर उत्पादन.
सध्या मंडईत शेतकऱ्यांना लसणाचा कमाल भाव 3 हजार रुपये किलोपर्यंत मिळत आहे. इतकंच नाही तर आझादपूर मंडईत (Azadpur Mandai) लसणाला मिळत असलेला दर पाहून तुम्ही सुद्धा आश्चर्य चकीत व्हाल. सध्याच्या परिस्थितीत मध्य प्रदेश, राजस्थान आणि महाराष्ट्रात लसणाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन (Bumper production garlic) झाले आहे. त्यामुळे लसणाच्या भावातमोठ्या प्रमाणात घट नोंदवली गेली आहे. महाराष्ट्रात लसणाला सर्वसाधारण बाजारभाव 2 हजार तर कमीत कमी 1 हजार 700 रुपये मिळत आहे.
तिरूपती बालाजीची संपत्ती जाहीर, आकडेवारी पाहून व्हाल चकित! वाचा सविस्तर
तसेच दिल्लीच्या तुलनेत महाराष्ट्रात चांगला असला तरी दुर्दैवाने हे दर उतरण्याची शक्यता देखील व्यक्त केली आहे. महत्वाची बाब म्हणजे आझादपूर मंडईत (Azadpur Mandai) आजकाल लसणाचा घाऊक भाव 5 ते 30 रुपये किलोपर्यंत विकला जात आहे. ही मंडई आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ आहे. शेकडो किलोमीटरचा प्रवास करून शेतकऱ्यांच्या शेतातून लसूण बाजारात आणला जात असताना बाजारात लसणाचा हा भाव आहे.
Akshay Kumar: मुलीच्या वाढदिवसानिमित्त अक्षय कुमारने केली खास पोस्ट; म्हणाला, “आज तू दहा वर्षांची…”