मुंबई : राजा हिंदुस्थानी सिनेमात आमिर खानसोबत एक छोटा मुलगा काम करत असतो. परंतु या बालकलाकाराबाबत बऱ्याच लोकांना माहिती नाही. हा बालकलाकार दुसरा तिसरा कुणी नसून कुणाल खेमू (Kunal Khemu) आहे. कुणालने बालकलाकार म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. आत्तापर्यंत त्याने कमी पण चांगल्या प्रोजेक्ट्समध्ये काम केलं.
कुणालचा जन्म हा २५ मे १९८३ रोजी श्रीनगर, जम्मू आणि काश्मीर (Jammu and Kashmir) या ठिकाणी झाला. अभिनेता रवी खेमू आणि ज्योती खेमू हे त्याचे आई वडील आहेत. कुणालने बर्नहॉल स्कूल श्रीनगरमधून प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर मीरा रोड येथील दालमिया हायस्कूलमध्ये पुढील शिक्षण व विलेपार्ले येथील SVKM च्या नरसी मोंजी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समध्ये त्याने पदवीचे शिक्षण घेतले.
या गावात चक्क 1000 वर्षांपासून केली जाते मांजरांची पुजा, कारण ऐकून होताल आश्चर्यचकित
बॉलीवूडमधील प्रत्येक अभिनेत्याप्रमाणे कुणाल खेमूनेही त्याच्या कारकिर्दीत चढ-उतार पाहिले आहेत. सोहा अली खान जेव्हा कुणाल खेमूसोबत ढुंढते रहे जाओगे मध्ये एकत्र काम करत होती तेव्हा तिने त्याच्याशी क्वचितच संभाषण केले असेल. पुढे कुणाल आणि सोहा पहिल्यांदा 2008 मध्ये आलेल्या ‘द डार्क नाइट’ हा चित्रपट पाहण्यासाठी एकत्र गेले होते. मग दोघांमध्ये नजिकता वाढत गेली. नंतर या जोडप्याने आपापल्या कुटुंबाच्या उपस्थितीत 2014 मध्ये लग्न केले. लग्नाआधी दोघेही लिव्ह इन मध्ये रहात होते. त्यांची मुलगी, इनाया नौमी केम्मू, 2017 मध्ये जन्मली आणि सध्या ती इंटरनेटवरील सर्वात लोकप्रिय बालकांपैकी एक आहे.
cup syrup: कफ सिरपमुळे लहान मुले दगावली, राज्य सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!