पुण्याचे खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांचे काल निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 73 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाने राजकीय क्षेत्रातून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर मनोरंजन क्षेत्रातून देखील हळहळ व्यक्त केली जात आहे.
अन् त्याने चक्क सापाच्या अंगावर पाणी ओतलं; पुढे घडलं असं की…, पाहा थरकाप उडवणारा Video
यामध्येच आता मराठी मनोरंजन विश्वातील अभिनेत्री रुचिता जाधवने गिरीश बापट यांना इंस्टाग्रामवर एक करत श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेत्रीने गिरीश बापट यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे. आणि कॅप्शन मध्ये लिहिले आहे की, “भाऊ.. तुमच्या छत्रछायेत मी लहानाची मोठी झाले.. आज माझ्या आयुष्यात अशी पोकळी निर्माण झाली की ती कधीच भरू शकणार नाही.. वडीलां सारखी तुमची माया आणि शाब्बासकी ची थाप मला कोण देणार.. तुम्हांला विसरणे तर शक्यच नाही.. भावपूर्ण श्रद्धांजली भाऊ” अशी भावुक पोस्ट अभिनेत्रीने शेअर केली आहे.
राखीनं उडवली मलायकाची खिल्ली, व्हिडिओ व्हायरल
ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. यावर प्रतिक्रिया देत नेटकरी गिरीश बापट यांना श्रद्धांजली वाहत आहेत. दरम्यान, काल गिरीश बापट यांच्या अंतिम दर्शनासाठी पुणेकरांनी तुफान गर्दी केली होती. त्याचबरोबर त्यांच्या अंतिम दर्शनासाठी अनेक बडे नेते देखील उपस्थित होते.