Site icon e लोकहित | Marathi News

Maratha Reservation । मराठा आरक्षणाला ओबीसींचा विरोध, टायर जाळत रास्ता रोको आंदोलन

Maratha Reservation

Maratha Reservation । संपूर्ण राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका मराठा समाजाने घेतली आहे. राज्य मागासवर्गाच्या अहवालात मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे. पण याला देखील मराठा समाजाने विरोध केला आहे. (Maratha Reservation Protest)

Maratha Reservation Bill । भरती प्रक्रियेत मराठा आरक्षणाचा फायदा होणार का? काय सांगते विधेयक जाणून घ्या..

याच पार्श्वभूमीवर आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण द्यावे, आधी अधिवेशनात सगेसोयरेच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करून मगासवर्ग आयोगाच्या अहवालावर चर्चा करा अशी मोठी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.या मागणीला ओबीसी संघटनांचा विरोध आहे. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये या मागणीसाठी ओबीसी समाजाकडून अहमदनगरमध्ये रास्ता रोको आंदोलन केले आहे.

Rituraj Singh । मनोरंजन विश्वाला मोठा धक्का! ऋतुराज सिंह यांचं निधन

मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, ओबीसीतून आरक्षण नको या मागणीसाठी कीर्तनवाडी येथे प्रल्हाद कीर्तने यांचं उपोषण सुरू असून आता या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आज ओबीसी समाजाच्या वतीने भगवान गडाच्या पायथ्याशी विशाखापट्टनम महामार्गावर रास्ता रोको केला. सरकारचा निषेध करण्यासाठी रस्त्यावर टायर पेटवला.

Manoj Jarange Patil । राज्य मागासवर्गाच्या अहवालावर जरांगे पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले; “मराठा समाजाला उपयोग..”

Spread the love
Exit mobile version