Site icon e लोकहित | Marathi News

Odisha Accident News । देवदर्शनासाठी चाललेल्या भाविकांवर काळाचा घाला, व्हॅनचा भीषण अपघात; ८ जणांचा मृत्यू तर ७ जण जखमी

Odisha Accident News

Odisha Accident News । सध्या अपघाताची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ओडिशाच्या क्योंझर जिल्ह्यातील NH 20 वर भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ८ जणांचा मृत्यू झाला असून ७ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रवाशांनी भरलेल्या व्हॅनने उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक दिली आणि हा भीषण अपघात झाला आहे. (Odisha Accident News)

Ajit Pawar । ब्रेकिंग! उपमुख्यमंत्री अजित पवार यांना छत्रपती संभाजीनगरमध्ये नो एन्ट्री! नेमकं कारण काय?

आज सकाळच्या सुमारास हा अपघात झाला असून या अपघातामध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत. प्रवाशांनी भरलेली व्हॅन मंदिराकडे जात असतानाच हा भीषण अपघात झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच तेथील स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

ChatGPT ने एका वर्षात केले ‘हे’ मोठे बदल; जाणून व्हाल थक्क

सुरुवातीला जखमींना घाटगाव रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं मात्र नंतर पुढील उपचारासाठी त्यांनाकटकच्या एससीबी मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले आहे. हा अपघात एवढा भीषण होता की, या अपघातामध्ये व्हॅनचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही आता या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

Accident News । ट्रक आणि जीपचा भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जणांचा मृत्यू तर ५ जण गंभीर जखमी

Spread the love
Exit mobile version