
ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहनगा रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी संध्याकाळी कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडीचा भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की ट्रेनचे अनेक डब्बे मालगाडीवर चढले. सात डब्बे पलटी झाले आहेत. या अपघातामध्ये अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. (Odisha Train Accident)
स्मार्टफोन घेताय तर थांबा! ‘असा’ स्मार्टफोन घेतल्यानंतर तुम्हालाही भोगावा लागेल 3 वर्षांचा तुरुंगवास
आता या अपघाताबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. ओडिशामधील ट्रेनचा अपघात घातपात तर नव्हता ना असा संशय व्यक्त केला जातोय. कारण ट्रॅकच्या इंटरलॉकिंग सिस्टीममध्ये जाणीवपूर्वक छेडछाड केल्याचे पुरावे रेल्वेला प्राथमिक तपासात मिळाले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येणार आहे. सीबीआयमार्फत याप्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे.
पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक रिंकेश रॉय यांनी सांगितले की, सीबीआयचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून चौकशी केली जात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनंतर बालासोर दुर्घटना हा अपघात नसून कट आहे का? असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.
क्रिकेट प्रेमींसाठी वाईट बातमी! दुखापतीमुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप मधून ‘हा’ खेळाडू बाहेर