
Politics News । महाविकास आघाडीकडून कोल्हापूर लोकसभा मतदासंघात (Kolhapur Lok Sabha Constituency) शाहू महाराज (Shahu Maharaj) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शाहू छत्रपती यांच्या प्रचाराचा नारळ देखील फुटला आहे. पण त्यांच्या प्रचाराला सुरुवात होताच राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. अशातच राजकीय वर्तुळातून खळबळजनक बातमी समोर येत आहे. (Latest marathi news)
शाहू महाराज यांच्याविरोथात सोशल मीडियावर (Social media) आक्षेपार्ह पोस्ट टाकली आहे. त्यामुळे राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे पाहायला मिळत आहे. यपर्णी सतेज पाटलांनी (Satej Patil) पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केली असून शाहू महाराज यांच्याविरोधात चुकीच्या पोस्ट व्हायरल होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
तर दुसरीकडे भाजपने काँग्रेस नेते रवींद्र धंगेकर यांना देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. शिक्षणाचं माहेरघर असणाऱ्या पुण्यात महाविकास आघाडीचा अशिक्षित उमेदवार असा प्रचार भाजपकडून करण्यात येत आहे. ‘रवींद्र धंगेकर फक्त 8 वी पास’, अशा आशयाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Prithviraj Chavan । शरद पवारांनी आदेश दिले तर… पृथ्वीराज चव्हाण यांनी केली मोठी घोषणा