महाराष्ट्रात काही संस्थाने विशेष प्रसिद्ध आहेत. शिर्डीचे साईबाबा संस्थान ( Saibaba Trust, Shirdi) हे यातीलच एक आहे. कोरोनाकाळात इतर संस्थानांप्रमाणेच हे संस्थान देखील बंद होते. परंतु निर्बंध कमी झाल्यानंतर साईबाबांच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. इतकंच नाही तर मागच्या एका वर्षात साईबाबा संस्थानाला मिळणारे दान देखील कोट्यवधी रुपयांनी वाढले आहे.
भूक कंट्रोल न झाल्याने हत्तीने खाल्ले चक्क…; पाहा व्हिडीओ
कोरोनाचे निर्बंध कमी झाल्यानंतर शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांचा ओघ वाढला होता. यावेळी सुमारे दीड कोटी भाविकांनी साईबाबांचे ( Saibaba) दर्शन घेतले. कोरोना काळात साईबाबा संस्थानाला फक्त 92 कोटींचे दान मिळाले होते. परंतु मागच्या वर्षी साईबाबा संस्थानात 398 कोटींचे दान जमा झाले आहे. यामध्ये 27 किलो सोने व 356 किलो चांदीचा समावेश आहे. तसेच एकूण दानामध्ये 73 कोटी 54 लाख रुपयांचे ऑनलाइन ( Online) दान जमा झाले आहे. 2019 मध्ये हेच दान 290 कोटी इतके आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नुकसानग्रस्तांसाठी राज्यसरकारने मंजूर केला कोटींचा निधी
मागील आठवड्यात साईबाबा संस्थानाकडून नुकतेच काही नवीन निर्णय घेण्यात आले आहेत. यानुसार भाविकांना साईबाबा समाधीला हात लावून दर्शन घेता येणार आहे. यामुळे साईभक्त आनंदांत असल्याचे पहायला मिळत आहेत. याशिवाय द्वारकामाई मंदिरात आतील बाजूस भाविकांना प्रवेश देणे, साईबाबांची आरती सुरू असताना मंदिराची परिक्रमा करू देणे या सवलती सुद्धा देण्यात आल्या आहेत.
संजय राऊतांचा काँग्रेसला इशारा; महाविकास आघाडीत फूट पडण्याची शक्यता