Ashadhi Ekadashi ।आषाढी एकादशीच्या (Ashadhi Ekadashi) निमित्ताने लाखो वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत. पहाटे २.५७ मिनिटांनी विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते सलग दुसऱ्यांदा विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. सर्वात म्हणजे आज पहिल्यांदाच विठुरायाच्या मूर्तीला चंदनाचा लेप लावून अभिषेक घालून विठ्ठलाची मंत्रोपचारामध्ये पूजा करण्यात आली.
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल; पाहा Photo
अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील निवासे येथील वाकडी गावातील रहिवासी असलेले भाऊसाहेब काळे (Bhausaheb Kale) आणि मंगला काळे (Mangala Kale) हे यावर्षी मानाचे वारकरी ठरले आहेत. महाआरतीनंतर मंदिरातील पुजाऱ्यांनी एकनाथ शिंदे आणि मानाचे वारकरी यांना विठ्ठलाची तुळशीची माळ देत पूजा संपन्न केली. तसेच मंदिर समितीच्या वतीने एकनाथ शिंदे आणि मानाचे वारकरी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी एकनाथ शिंदे यांनी बळीराज्याला चांगले दिवस येऊ दे तसेच कष्टकरी, वारकरी सर्व समाज घटक सुखी समाधानी होऊ दे हे साकडे विठुरायाकडे केले आहे.
बहुजनांच्या पोरांना भडकावणाऱ्या संभाजी भिडेंना अटक झालीच पाहिजे; छगन भुजबळ यांची मागणी
दरम्यान १९७३ पासून मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय पूजा वारकरी दांपत्यासह करण्यात येते. मानाचे वारकरी कोण असणार? हे ठरवण्याचा अधिकार मंदिर समितीकडे असतो. दर्शन रांगेत सगळ्यात पुढे असलेल्या दांपत्याला हा मान दिला जातो. तसेच महापूजेनंतर त्यांचा मंदिर समितीतर्फे सत्कारही करण्यात येतो. महाराष्ट्रातल्या परंपरेनुसार आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे आजही ही महापूजा पार पडली.
Urfi Javed। बॉडीकॉन ड्रेसमुळे उर्फी पुन्हा चर्चेत! चाहत्यांचे वेधले लक्ष