सध्या एक आगळीवेगळी बातमी समोर आली आहे. युगांडा (Uganda Man) या देशात राहणाऱ्या 68 वर्षीय व्यक्ती सध्या खूप चर्चेत आला आहे. हा व्यक्ती चर्चेत येण्याचं कारण असं की, या व्यक्तीचे एक नाही दोन नाही तर तब्बल बारा लग्न झाले आहेत. त्या व्यक्तीला एकट्याला १२ बायका आहेत. बायकांपासून त्याला १०२ मुले आहेत. तर या मुलांनी जन्म दिलेल्या मुलांमुळे त्याला जवळपास ५७८ नातवंडे आहेत. त्यामुळे सध्या या अनोख्या कुटुंबाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा चालू आहे.
देशातील साखर उत्पादनात वाढ; साखरेच्या दरात होऊ शकते घसरण
युगांडा या देशात व्यक्ती राहत असून मूसा हसह्या कसेरा असे या व्यक्तीचे नाव आहे. आता या व्यक्तीला त्याच्या मुलांची आणि नातवंडांची नावे देखील लक्षात राहत नाहीत. मूसा याला १२ बायका असून त्यांचे १०२ मुले आहेत. त्यांच्या मुलांचे वय १० ते ५० वर्षांपर्यंत आहे.
इंस्टाग्राम रिल्स मधून ‘असे’ कमवा पैसे! फक्त व्हिडीओ बनवून व्हाल मालामाल
मुसा हा युगांडाच्या बुटालेजा जिल्ह्यातील बुगिसा गावात राहत असून त्याचे संपूर्ण गावामध्ये सर्वात मोठे कुटूंब आहे. कुटुंब वाढविण्याबद्दल मुसा म्हणाला त्यावेळी मजेशीर वाटले मात्र आता समस्या बनली आहे. कारण या सर्व मुलाच्या गरजा भागविणे सोपी गोष्ट नाही. दरम्यान, आता मुसा यांचे हे मोठं कुटूंब पर्यटकांच आकर्षण ठरलंय. अनेक पर्यटक या ठिकाणी भेटी द्यायला येतात.