Site icon e लोकहित | Marathi News

अरे बापरे! मुलाला साप चावताच, मुलगाही चावला सापाला; पाहा नेमकं काय आहे प्रकरण?

Oh dear! As soon as the boy was bitten by the snake, the boy was also bitten by the snake; See what exactly is the case?

बहुतांश लोकांना साप या प्राण्याबद्दल भीतीमिश्रित कुतूहल असते. जर कुणाच्या घरात,अंगणात साप शिरला, तर तो किती मोठा आहे हे लांबून बघायला मोठ्या प्रमाणात गर्दी जमते. पण दुसरी गोष्ट म्हणजे बहुतांश लोकांना सापाची खूपच भीतीच वाटते. दरम्यान चुकून जर एखाद्या व्यक्तीला साप चावला तर तो किती विषारी होता की बिनविषारी होता याचा विचार न करता माणूस भीतीनेच अर्धमेला होतो. खरतर जशपूरमध्ये मोठ्या प्रमाणात साप आढळतात. त्यामुळेच येथे साप चावण्याच्या घटनाही मोठ्या प्रमाणात घडत असतात.

पुणे येथे फलोत्पादन पिकांमधील मूल्यसाखळी वृद्धी-क्षमता व संधी या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

दरम्यान अशीच एक घटना छत्तीसगडमधील जशपूरमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जशपूरमध्ये एका मुलाला विषारी साप चावला. परंतु साप चावल्यानंतर भडकलेल्या मुलाने न घाबरता उलट त्याने सापावरच पलटवार केला.

Elon Musk: एलॉन मस्क यांची मोठी घोषणा! ट्विटर ‘ब्लू टिक’साठी आता दर महिन्याला मोजावे लागणार ‘इतके’ पैसे

नेमकी घटना काय घडली?

पांडरपथ येथे राहणारा हा बालक त्याच्या घरापासून काही अंतरावर बहिणीच्या घरी गेला होता. दरम्यान यावेळी खेळत असतानाच अचानक नागाने त्याच्या हाताला दंश केला. मग पुढे काय या मुलाने कोलमडून न जाता सर्पदंशानंतर बेधडक मुलगा संतापला. दरम्यान त्या मुलाने साप तिथून निघून जाण्यापूर्वीच त्याला पकडून दाताने जोरदार चावा घेतला. सापाने मुलाच्या हाताला गुरफटून घेतले होते. मात्र, मुलानेही सापाला चावा घेऊन त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर साप जागीच मरण पावला.

महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी! आता अॅमेझाॅन कंपनीने ठाण्यात केली मोठी गुंतवणूक

दरम्यान ही घटना मुलाने त्याच्या बहिणीला सांगितली. मग बहिणीने हा सर्व प्रकार आजोबांना सांगितला. दरम्यान मुलाला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. सुदैवाने आता तो पूर्णपणे बरा आहे. जशपूरमध्ये राज्यातील 80 टक्के साप , कोब्रा आणि क्रेटच्या सर्वात विषारी प्रजाती आढळत असतात. त्यामुळे या जिल्ह्याला छत्तीसगडचा नागलोक म्हणूनही ओळखले जाते. येथे सापांच्या 70 हून अधिक प्रजाती आढळतात.

पुण्यात घडली माणुसकीला काळीमा फासणारी घटना, चक्क म्हशीच्या रेडक्यावर केला अनैसर्गिक लैंगिक अत्याचार

Spread the love
Exit mobile version