
आधीच्या काळात वडापाव, सामोसा, पाणीपुरी हे पदार्थ लोकांसाठी फास्टफूड ( Fast Food) होते. मात्र, सध्या फास्टफूड म्हंटल की बर्गर,पिझ्झा, फ्राईज यांसारखे पदार्थ डोळ्यासमोर येतात. आज लहानांपासून-मोठ्यांपर्यंत सर्वांनाच या पदार्थांचे आकर्षण आहे. यामध्ये बर्गर विशेष प्रसिद्ध आहे. बर्गर खायचा म्हंटल की लोक मॅकडोनाल्ड किंवा किंग बर्गरच्या दिशेने वळतात. मात्र, पंजाब येथील एका शेफने बनवलेला देसी बर्गर सध्या विशेष चर्चेत आहे. या बर्गरचे वजन चक्क 30 किलो इतके आहे.
आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी कोचर दांम्पत्याला सीबीआय कडून अटक
बर्गर आधीच मोठा असतो त्यात हा 30 किलोचा बर्गर तर एवढूशा मानवी तोंडासाठी महाकाय असणार आहे. या बर्गरला जायंट बर्गर असे नाव दिले असून हा भारतातील सर्वात मोठा बर्गर ( country’s Biggest Burger) आहे. या बर्गरचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. अमृतसर येथील प्रसिद्ध फूड ब्लॉगर अक्षय याने त्याच्या ‘a_garnish_bowl_’ या इंस्टाग्राम पेजवर हा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओला त्याने भारतातील सर्वात मोठा बर्गर असे कॅप्शन दिले आहे.
पंजाबच्या होशियारपूरमधील ‘सिक्स 10 बर्गर’ रेस्टॉरंटमध्ये हा बर्गर तयार करण्यात आला आहे. या बर्गरला बनवण्यासाठी मोठी सामग्री वापरण्यात आली आहे. हा बर्गर बनवण्यासाठी तब्बल 12 किलो बन, 16 किलो भाज्या, 5 ते 6 किलो सॉस, एक किलो पनीर यासह 6 किलो टिक्की वापरण्यात आल्या आहेत. शेफच्या सांगण्यानुसार या बर्गरचे वजन 30 किलो पेक्षा जास्त असू शकते.
दाक्षिणात्य व बॉलिवूड चित्रपटांमध्ये तुलना केली जाऊ नये; ‘केजीएफ’ स्टार यशचे मोठे वक्तव्य