मागच्या काही दिवसामध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी एका सभेमध्ये “स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटिशांकडून (British) पेन्शन घ्यायचे, त्यांनी ब्रिटिशांची माफी मागितली होती”, असं वक्तव्य केल होत. राहुल गांधींच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे मनसेने आक्रमक पवित्रा धारण केली होती. दरम्यान, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) आता राहुल गांधींवर जहरी टीका केली आहे.
भाजपला धक्का! गुजरात निवडणुकीच्या तोंडावर ‘या’ मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश
राज ठाकरे म्हणले, “त्या दिवशी राहुल गांधी महाराष्ट्रात आले होते. त्यांनी महापुरुषांची बदनामी केली, ते गुळगुळीत मेंदूचे आहेत. अरे गधड्या सावरकरांबद्दल बोलायची तुझी लायकी आहे का?”, असं म्हणत राज ठाकरेंनी गांधींवर जहरी टीका केली आहे. त्याचबरोबर “ सावरकरांना कोठे ठेवले होते, त्यांनी काय हालअपेष्टा सहन केल्या, याची कल्पनातरी आहे का?” असा प्रश्न देखील राज ठाकरेंनी उपस्थित केला.
दौंड तालुक्यातील शेतकरी गुलाब शेतीतून कमावतोय लाखो रुपये
काय म्हणाले राहुल गांधी?
वाशिम (Washim) येथे भारत जोडो यात्रेदरम्यान बोलताना राहुल गांधींनी सावरकरांबाबत एक विधान केले होते. यावेळी बोलताना राहुल गांधी म्हणाले, “सावरकर हे ब्रिटिशांकडून पेंशन घेत होते”.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अजित पवारांचं वक्तव्य चर्चेत; पाहा नेमकं काय म्हणाले?