Site icon e लोकहित | Marathi News

अरे बापरे ‘या’ ठिकाणी मोठा चमत्कार! चार पायांच्या कोंबडीच्या पिल्लाचा झाला जन्म

Oh God, a great miracle at this place! A four-legged chick was born

आपल्या आजूबाजूला नेहमी अजब-गजब प्रकार घडत असतात. ज्यामुळे आपण आश्चर्यचकित होत असतो. सध्या कोल्हापूर (Kolhapur) मध्ये असाच एक आश्चर्यचकित करणारा प्रकार घडला आहे. तेथील एका कोंबडीने ( Hen) नुकताच चार पायांच्या पिल्लाला जन्म दिला आहे. या पिल्लाची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.

दुधाच्या दरात पुन्हा वाढ; ‘हे’ आहेत नवीन दर

कोल्हापूर मधील पन्हाळा तालुक्यातील बोरीवडेत ही घटना घडली आहे. सखाराम हिंदूराव शिंदे यांच्या कोंबडीने 12 पिल्लांना जन्म दिला. यातील एका पिल्लाला चार पाय आहेत. (Chicken with Four Legs) महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे पिल्लू जिवंत असून ते इतर पिल्लांच्यात देखील मिसळत आहे.

बिग ब्रेकिंग! पुण्यातील नवले ब्रिज जवळ भीषण अपघात! कंटेनरने २६ गाडयांना उडविले

खरंतर कोंबडीच्या पिल्लाला सामान्यतः दोनच पाय असतात. परंतु या पिल्लाला चार पाय असल्याने कोल्हापूरमधील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची पाहणी केली. यावेळी ही घटना अत्यंत दुर्मिळ असल्याचे त्यांनी सांगितले.

याआधी देखील कोल्हापूर मध्ये आणखी एक चमत्कार झाला होता. मागच्या काही दिवसांत देशातील सगळ्यात मोठे अंडे कोल्हापुरातील एका पोल्ट्रीमध्ये आढळून आलं होतं. या अंड्याचे वजन चक्क 210 ग्रॅम होते. त्यामुळे या अंड्याला महाजंम्बो अंडे असे नाव देण्यात आले होते.

या चहाची किंमत आहे कोटींच्या घरात; जगातील सर्वात महागड्या चहाबद्दल तुम्हाला माहित आहे का?

Spread the love
Exit mobile version