नंदूरबार: बरेच शेतकरी पहिल्यापासून पारंपरिक शेती करत असतात. मग यामध्ये गहू, ज्वारी, बाजरी, ऊस अशी अनेक पिके शेतात घेतली जातात. परतू नैसर्गिक आपत्ती असो वा अतिवृष्टी असो यामुळे या पिकांचं नुकसान होत. दरम्यान यावर उपाय म्हणून नंदूरबार (Nandurbar) जिल्ह्यातील शहादा (Shahada) तालुक्यातील 80 शेतकऱ्यांनी एकत्र येत गवती चहा (लेमन ग्रास) लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. मुंबईच्या कंपनीसोबत करार करत अडीचशे एकर क्षेत्रावर लेमन ग्रास (Lemongrass) ची लागवड केली आहे. या माध्यमातून ते शाश्वत उत्पादन घेत आहेत.
Shivsena: शिवसेनेच धनुष्यबाण कुणाचं? आज सुप्रीम कोर्टात होणार सुनावणी
दरम्यान यावेळी लोणखेडा येथील किशोर देविदास पाटील यांनी नैसर्गिक आपत्तीमुळं पारंपारिक शेती परवडत नसल्यानं पर्यायांचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी त्यांना पर्याय म्हणून लेमन ग्रास समोर आला. त्यांनी या पिकाबद्दल योग्य ती माहिती घेतल्यानंतर त्यांनी डेहराडून येथून लेमन ग्रासची रोपे मागवून त्याची लागवड केली. त्यानंतर मुंबई येथील काँटो ऍग्रो वर्ल्ड प्रा. या कंपनीसोबत करार केला. त्यांच्या शेतातील लेमन ग्रास कंपनी खरेदी करुन त्यावर प्रक्रिया करुन त्यापासून सुगंधी तेल तयार करते. त्यातून शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळत असल्याची माहिती शेतकरी किशोर पाटील यांनी दिली. पुढे ते म्हणाले की, शेतकऱ्यांनी शाश्वत दराची हमी असेल अशा पिकांची लागवड करणं आता काळाची गरज ठरली आहे.
Alia-Ranbir: “आलीया रात्रभर बेडवर…”, रणबीर कपूरने केला आलियाच्या ‘या’ सवयीचा खुलासा
लेमन ग्रास पिकाचे वैशिष्ट्य
लेमन ग्रास रोपांची लागवड दोन फूट बाय एक फूट या अंतरावर केली आहे. एक एकर क्षेत्रासाठी 22 हजार रोपे लागतात. दरम्यान यासाठी शेतकऱ्यांना 60 हजार रुपयांचा खर्च आला आहे. लेमन ग्रास पिकाला कमी पाणी लागते. त्यामुळे हे पीक शेतकऱ्यांसाठी वरदान ठरु शकते. विशेष बाब म्हणजे लेमन ग्रास पिकाची एक वेळेस लागवड केल्यानंतर त्या पिकाची सलग सहा वर्षे उत्पन्न मिळते. त्यामुळं यापासून शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळू शकतो. लेमन ग्रासपासून तयार करण्यात आलेल्या सुगंधी तेलाला देशात आणि विदेशात मोठ्या प्रमाणात मागणी आहे.
Solapur: केळींच्या निर्यातीत सोलापूर जिल्हा आघाडीवर; उसापेक्षा जास्त उत्पन्न