पुणे : सध्या पुण्यातुन एक वेळीच घटना समोर येत आहे. बाहेरील जिल्ह्यातील एक विद्यार्थी एमपीएससी (Mpsc) करण्यासाठी पुण्यात आला आहे. दरम्यान आता दिवाळी असल्यामुळे तो सुट्टीला गावाकडे निघाला होता. विद्यार्थी अलका चौकामधून गावाला चालला होता. पण गावाला जात असताना त्याला पोलिसांनी अडवले त्यामुळे त्याची ट्रेन हुकली. ट्रेन हुकल्यानंतर तो संतापला. पोलिसांचा निषेध करत त्याने चौकात झोपूनच गोंधळ घालायला सुरवात केली.
लग्नाच्या पहिल्याच दिवशी नवरीच कृत्य पाहून नवरा अजूनही शॉकमध्ये, कारण…
हा विद्यार्थी त्याच्या मित्रांसोबत दुचाकीवर स्टेशनकडे निघाला होता. तीन वाचून पंधरा मिनीटांनी त्याची ट्रेन प्लॅटफॉर्मवरून निघणार होती. पण मधेच त्याला पोलिसांनी (Police) त्याला अडवलं आणि त्याची चौकशी केली. त्याला सर्व कागदपत्रे मागितीला त्याच्याकडे सर्व कागदपत्रे होती पण त्याच्यावर पण जुने चलन भरायचे बाकी होते. त्या दोघांकडे देखील पैसे नसल्याने ते पोलिसांना म्हणाले आम्ही नंतर पैसे देऊ आत्ता आम्हाला जाऊद्या आमची ट्रेन जाईल, पण पोलिसांनी आणखी एक चलन फाडलं आणि त्याचं लायसेन्स देखील जप्त केलं.
थरारक घटना, पुराच्या पाण्यात कारसह बाप लेकीवर काळानं घाला घातला
या सगळ्या गोष्टी घडल्यानंतर त्या दोघांची ट्रेन तोपर्यंत निघून गेली होती. त्यानंतर तो एक विद्यार्थी (Student) चांगलाच संतापला. यावेळी विद्यार्थी थेट रस्त्यावर झोपला आणि त्याने या घटनेचा निषेध केला. विद्यार्थी म्हणाला, “मी सहा महिने घरी गेलो नव्हतो. माझी घरची परिस्थिती खूप बिकट आहे. माझ्याकडे तिकीट खरेदीसाठी देखील पैसे नव्हते”.
थरारक घटना, पुराच्या पाण्यात कारसह बाप लेकीवर काळानं घाला घातला
पोलिसांमुळेच मी गावाला जाऊ शकलो नाही. माझे घरचे माझी वाट पाहत आहे. आता मी काय करू? मी मरेपर्यंत येथेच झोपणार आहे. असं तो विद्यार्थी बोलू लागला. दरम्यान, पोलिसांना त्यांची सर्व चूक लक्षात आली व त्यांनी त्याला स्वता रिक्षा करून दिली. त्याचबरोबर त्या विद्यार्थ्याला एका खासजी ट्रॅव्हल्समध्ये बसवून गावाला पाठवून दिले.