मुंबई : सोशल मीडियावर वेगेवेगळे गमतीशीर व्हिडीओ (Video) व्हायरल होत असतात. असाच एक आता कुत्र्यांचा (Dog) व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो व्हिडीओ पाहून तुम्ही देखील आश्चर्यचकित व्हाल. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये कुत्रे लहान मुलांसारखे स्कूल बसची वाट पाहताना दिसतायेत. विशेष म्हणजे सर्व कुत्रे अगदी लहान मुलांसारखे एका पाठोपाठ एक असे रांगेत उभे असताना दिसत आहेत. पाठीवर स्कूल बॅग आणि गळ्यात पिवळ्या रंगाचा स्कार्फ घातलेला दिसतोय.
Heavy rain: आज राज्यात मुसळधार पावसाची शक्यता!
हा व्हिडीओ ट्विटरवर Buitengebieden नावाच्या युजर्सने केलाय. व्हिडीओ शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, “कुत्रे स्कूल बसची वाट पाहात आहेत”. या व्हिडिओला जवळपास ८३ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. आणि 6,500 पेक्षा जास्त लोकांनी रिट्विट केले आहे.
Waiting for the dog school bus.. 😅
— Buitengebieden (@buitengebieden) October 1, 2022
🎥 IG: victoriadw619 pic.twitter.com/5ymcPweRnl
हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. नेटकरी यावर वेगेवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. यावर एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘त्या कुत्र्यांच्या गोंडस बॅग पाहा.’ तर दुसर्या युजरने लिहिले की, ‘कुत्रे नेहमी माणसांचे ऐकतात’.
महत्वाची बातमी! तिकीट मशीन बिघडल्यास कंडक्टरच्या पगारातून पैसे होणार कट