लावणी म्हंटल की गौतमी पाटील असं समीकरण आज महाराष्ट्रात झाले आहे. अश्लील डान्स मुळे वादाच्या भोवऱ्यात अडकलेल्या गौतमी पाटीलचे कार्यक्रम बंद व्हावेत अशी मागणी दिवसेंदिवस जोर धरू लागली आहे. राज्यातील लावणी कलाकार व संघटना यांनी ही मागणी केली आहे. परंतु, दुसरीकडे गौतमीने लावणी बंद करणार नसल्याचे सांगितले आहे.
“हे वर्ष कटू आणि गोड आठवणींनी…”, एकनाथ शिंदेंची ‘ती’ फेसबुक पोस्ट चर्चेत
दरम्यान, सध्या मात्र गौतमीचे कार्यक्रम थांबलेले नाहीत. नुकताच सोलापूर ( Solapur) येथे गौतमीचा एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात लोकांना उभे राहायला जागा नाही एवढी गर्दी होती. इतकंच नाही तर गौतमीला पाहण्यासाठी लोक खुर्च्या बॅरिकेट्स तोडून गौतमीला पहायला गेले होते. सोलापूर मधील नातेपुते या गावात गौतमीचा हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला फक्त तरुणांनीच नाही तर वृद्धांनी देखील हजेरी लावली होती.
अपघाताबाबत ऋषभ पंतचा मोठा खुलासा; म्हणाला, “झोप लागल्यामुळे नाही तर…”
कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दीला रोखण्यासाठी खास बॅरिकेट्स लावण्यात आले होते. मात्र, ते बॅरिकेट्स तोडून तरुणांनी आतमध्ये प्रवेश केला. लोकांना उभं रहायला तर जागा न्हवतीच परंतु, ज्या खुर्च्या होत्या त्या फेकून देऊन लोक गौतमीला ( Gautami Patil) पाहत होते. गौतमी पाटीलच्या डान्सवर काहीजण शिट्ट्या वाजवत होते तर काही गाण्यावर ताल धरत होते. मात्र हा कार्यक्रम व्यवस्थित पार पडला जावा यासाठी पोलिसांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली होती.
ठरलं! ‘या’ तारखेला कियारा आडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा करणार लग्न