मुंबई : मुंबईतील (Mumbai) मुंबादेवी संकुल हे मुंबादेवीसाठी प्रसिद्ध आहे. पण या देवीच्या परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदअधिकाऱ्याचा वृद्ध महिलेला मारहाण करून शिवीगाळ केली. प्रकाश देवी असे या वृध्द महिलेचे नाव आहे. पीडित महिलेचा दोष एवढाच होता की तिने त्यांना दुकानातील खांब हटवण्याची विनंती केली होती.
Narendra Modi: पंतप्रधान मोदींसह या नेत्यांवर अमेरिकेत गुन्हा दाखल, कारण..
नेमक प्रकरण काय आहे?
मुंबादेवी परिसरात प्रकाश देवी यांचे मेडिकलचे दुकान आहे. दरम्यान या दुकानासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अधिकारी विनोद अरगिले व त्यांचे साथीदार जाहिरातीसाठी लाकडी खांब लावत होते. प्रकाश देवी यांच्या मेडिकलसमोर असाच एक खांब उभारला जात होता.दरम्यान याला प्रकाश देवी यांनी विरोध केला.आण पुढे हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले.
Prashant Bamb: “…ते आमच्या पिढ्या बरबाद व्हायला कारणीभूत”, आमदार प्रशांत बंब यांचे वादग्रस्त वक्तव्य
विभाग प्रमुख विनोद अरगिले हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी पीडित महिलेला मारताना व्हिडिओमध्ये
दिसत आहेत. विनोदचा राग एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने महिलेला धक्काबुक्कीही केली.पीडित महिलेने आरोप केला आहे की, विनोद अरगिले याने आपल्याला केवळ मारहाणच केली नाही तर तिच्यासोबत असलेल्या लोकांनीही शिवीगाळ केली.
झारखंडच्या राज्यपालांकडून JMM शिष्टमंडळाने मागितली भेटीची वेळ, 4 वाजता होणार भेट