
मुंबई : कोणतही क्षेत्र असो मग यामध्ये बिझनेस वाढावा आण इन्कम जास्त व्हावा यासाठी ऑफर लावल्या जातात. दरम्यान अशातच बॉलिवूड इंडस्ट्रीने तिकिटांवर ऑफर (Offer on tickets) सुरू केल्या आहेत. विशेष म्हणजे नॅशनल सिनेमाडेच्या निमित्ताने तिकिटांवर ऑफर लावण्याची सुरूवात झाली. दरम्यान देशातील अनेक मल्टिप्लेक्समध्ये 23 सप्टेंबर रोजी फक्त 75 रूपयांत प्रेक्षकांनी सिनेमा बघितला. या ऑफरमुळे ब्रह्मात्र (Brahmastra) या सिनेमाला (Movie) चांगलाच फायदा झाला. दरम्यान ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाच्या मेकर्सनी नवरात्रोत्सवाचं निमित्त साधत तीन दिवसांची विशेष ऑफर(offers) जाहीर केली होती. या ऑफर फक्त 100 रूपयांत सिनेमा पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळाली. महत्वाची बाब म्हणजे या ऑफरला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.
दरम्यान आता अशीच एक खास ऑफर ‘गुडबाय’च्या ( Goodbye) मेकर्सनी देखील केलीये. येत्या 11 ऑक्टोबरला ‘गुडबाय’ चित्रपट फक्त 80 रूपयांत पाहता येणार आहे. मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की 11 ऑक्टोबरला नेमक काय आहे? तर 11 ऑक्टोबरला महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांचा 80 वा वाढदिवस आहे. याच निमित्ताने ‘गुडबाय’ मेकर्सनी प्रेक्षकांसाठी ही खास ऑफर जाहीर केली आहे. कारण ‘गुडबाय’ चित्रपटात अमिताभ बच्चन, रश्मिका मंदाना व नीना गुप्ता मुख्य भूमिकेत आहेत.
‘गुडबाय’ हा चित्रपट 7 ऑक्टोबरला रिलीज झाला. ‘गुडबाय’ला पहिल्या दिवशी प्रेक्षकांचा फारच कमी प्रतिसाद मिळाला असून पहिल्या दिवशी फक्त 1.2 कोटींचा बिझनेस केला. दरम्यान दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी या चित्रपटाने 1.50 कोटींची कमाई केली. म्हणजेच दोन दिवसांत या चित्रपटाने केवळ 2.70 कोटींचा गल्ला जमवला. महत्वाची बाब म्हणजे ‘गुडबाय’चा बजेट 30-40 कोटी आहे. परंतु चित्रपटाचं आत्तापर्यंतच कलेक्शन पाहता हा सिनेमा बजेट वसूल करणार की नाही, अशी चिंता मेकर्सला लागली आहे.
T20 World cup स्थान न मिळाल्याने टीम इंडियाच्या ‘या’ स्टार बॉलरचं आता एकच लक्ष्य