दसऱ्याला ‘या’ गावात रामाची नाही, तर रावणाची होते पूजा; तब्बल दोनशे वर्षांपासून परंपरा चालू

हिंदू धर्मात दसऱ्याला विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान रामाने रावणाचा (Ravana) वध करून वाईटावर चांगल्याचा विजय मिळवला होता. म्हणून याला विजयादशमी (Vijayadashami) असेही म्हणतात. यंदा दसरा 5 ऑक्टोबरला म्हणजे उद्या साजरा होत आहे. लंकेचा राजा असण्यासोबतच रावण हा भोलेनाथाचा मोठा भक्त होता. म्हणून रावणाला देखील महान विद्वान म्हणतात. महाराष्ट्रात अकोला (Akola) येथील पातूर तालुक्यातील सांगोळा (Sangola) गावात रावणाची पूजा (Puja) केली जाते. तसेच हे मंदिर या गावाचे वैशिष्ट्य असून श्रद्धास्थान आहे.

पोलिसांना घरबांधणीसाठी मिळणार कर्ज; मंत्रिमंडळ बैठकीत शिंदे-फडणवीस सरकारने घेतला मोठा निर्णय

या गावात रावणातील दुर्गुण बाजूला सारून त्याच्यातील चांगल्या गुणांची इथे पूजा होते. तपस्वी, बुद्धिमान, महापराक्रमी, वेदाभ्यासी, एकवचनी या गुणांमुळे रावणाची पूजा केली जाते. ही परंपरा तब्बल दोनशे वर्षांपासून जोपासली जात आहे. संगोळ्यातील रावणाचे मंदिर जिल्ह्यातीलच नव्हे, तर राज्यातील एकमेव असल्याचे बोलले जाते. तसेच सांगोळा गावाव्यतिरिक्त विदर्भातील आदिवासी जमाती या रावण पूजा करतात. दसऱ्याच्या सणाला रावणाच्या मूर्तीला हार, फुलं वाहली जातात. मूर्तीसमोर दिवे पेटवले जातात.

Katrina Kaif: ‘या’ चित्रपटात कतरिना दिसणार भूताच्या भूमिकेत, प्रेक्षकांची उडणार घाबरगुंडी

रावणाची नगरी लंका जरी अकोल्यापासून हजारो किलोमीटर दूर असली, तरीसुद्धा अकोला जिल्ह्यातील सांगोळा गावात रावणाची मनोभावे पूजा केली जाते. या पुजेमागच सत्य अस की, गेल्या दोनशे वर्षांपूर्वी या भागात वास्तव्यास एक ऋषी आला होता. दरम्यान या ऋषीने गावाच्या पश्चिमेस असलेल्या जंगलात तपस्या केली होती. त्यांच्या प्रेरणेने गावात अनेक धार्मिक उपक्रम होत असे.

Eknath Shinde: धक्कादायक! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सही वापरून दुकानदाराला लावला १ कोटींचा चुना

ऋषींनी एका शिल्पकाराकडे त्यांची मूर्ती घडवण्याचे काम दिले होते, पण शिल्पकराच्या हातून रावणाची मूर्ती घडली. मूर्ती घडवताना शिल्पकाराने दहा तोंडे, काचा बसवलेले वीस डोळे, सर्व आयुध असलेले वीस हात अशी विराट मूर्ती त्याने घडवली. रावणाची चार ते साडेचार फूट उंच काळ्या दगडातील ही मूर्ती कुणालाही आश्चर्यचकित करते. तसेच या गावात रावणाच्या मंदिराव्यतिरिक्त एक हनुमानाचे मंदिर आहे.

Rohit Sharma: मोठी बातमी! रोहित शर्माला पोलिसांकडून अटक? सोशल मीडियावर फोटो व्हायरल

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *