Ajit Pawar । अजित पवार यांनी आपल्या काही सहकारी नेत्यांसोबत राष्ट्रवादी पक्ष (NCP) फोडला आहे. त्यांच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडीला धक्का बसलाच, परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनाही खूप मोठा धक्का बसला. शरद पवारांचे जवळचे आणि विश्वासू नेत्यांनी त्यांची साथ सोडली. शिवाय अजित पवार यांनी पक्ष आणि चिन्हावरही दावा केला आहे. (Latest Marathi News)
Ganesh Chaturthi 2023 । अनंत चतुर्दशी दिवशी ‘या’ शुभ मुहूर्तावर करा लाडक्या गणरायाचे विसर्जन
सत्तेत सहभागी झाल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार गटाच्या भेटीगाठी होत आहेत. अशातच अजित पवार गटात असणारे खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी शरद पवार यांच्यासोबत फोटो शेअर केला होता. त्यावरून अजितदादांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर अजित पवार म्हणाले, “मला त्याबद्दल काही बोलायचं नाही, विकासकामांबद्दल बोला,” अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.
Madhuri Dixit । माधुरी दीक्षित लढणार लोकसभा निवडणूक? ‘त्या’ भेटीवरून चर्चांना उधाण
नवीन संसद भवनात कामकाजाला सुरुवात झाली असता प्रफुल्ल पटेल आणि पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एकत्र फोटो काढला होता. हा फोटो पेटल यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन शेअर केला. इतकेच नाही तर त्यांनी फोटो शेअर करत आपल्या भावनाही व्यक्त केल्या होत्या. त्यावरून पुन्हा एकदा राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
Pandharpur । शंभर तासानंतरही उजनीचे पाणी पंढरपुरात पोहोचले नाही, जाणून घ्या यामागचं कारण