Ganesh Chaturthi 2023 । अनंत चतुर्दशी दिवशी ‘या’ शुभ मुहूर्तावर करा लाडक्या गणरायाचे विसर्जन

On the auspicious time of Anant Chaturdashi, immerse the beloved Ganaraya

Ganesh Chaturthi 2023 । देशात दरवर्षी गणेशोत्सव (Ganeshotsav) मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. फक्त देशातच नाही तर विदेशातही हा सण (Ganeshotsav 2023) साजरा करतात. अबालवृद्धांचे लाडके दैवत असणाऱ्या बाप्पाच्या आगमनाची सर्वचजण आतुरतेने वाट पाहत असतात. काही जण दीड, तीन, पाच किंवा सातव्या दिवशी लाडक्या गणरायाचे विसर्जन करतात. तर काही जण अनंत चतुर्दशीच्या (Anant Chaturdashi) दिवशी विसर्जन करतात. (Latest Marathi News)

Madhuri Dixit । माधुरी दीक्षित लढणार लोकसभा निवडणूक? ‘त्या’ भेटीवरून चर्चांना उधाण

जाणून घ्या अनंत चतुर्दशीचा शुभ मुहूर्त

दरम्यान, गुरुवार 28 सप्टेंबर 2023 रोजी गणेश विसर्जनाचा शुभ मुहूर्त 06 : 11 ते सकाळी 7 : 40 पर्यंत असणार आहे. तसेच तुम्हाला संध्याकाळी गणेश विसर्जन 04:41 ते 09:10 या शुभ मुहूर्तावर करता येणार आहे. (Ganesh Chaturthi)

Pandharpur । शंभर तासानंतरही उजनीचे पाणी पंढरपुरात पोहोचले नाही, जाणून घ्या यामागचं कारण

पूजा पद्धत

गणरायाचे विसर्जन करण्यापूर्वी विधीप्रमाणे पूजा करणे गरजेचे आहे. या पूजेदरम्यान गणरायाला दुर्वा, मोदक, लाल चंदन, लाल फुले, सुपारी, धूप-दीप इत्यादी अर्पण करावे. कुटुंबासह आरती करावी आणि या दिवशी हवन करणे शुभ मानले जाते. तसेच शेवटी, आपल्या चुकांसाठी गणरायाची माफी मागून त्याच्या लवकर परत येण्याची इच्छा देखील बोलून दाखवा. त्यानंतर विसर्जन करा.

Pune News । पुणे परिसरातील घाटातून जात असाल तर सावधान! सलग दुसऱ्या दिवशीही कोसळली दरड

पूजेचे महत्त्व

हिंदू धर्मामध्ये गणरायाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. कारण गणेशोत्सवाच्या 10 दिवसांत गणरायाची आराधना केली तर भाविकांचे सर्व दु:ख नाहीसे होतात, अशी धारणा आहे. गणरायाचे विसर्जन अनंत चतुर्दशीला करतात. या दिवशी बाप्पा आपल्या घरी परत जातात, असे मानले जाते. त्यामुळे त्यांना आपण आनंदाने निरोप द्यावा.

Nagpur Flood । नागपूरमध्ये 10 हजार घरांत पाणीच पाणी, नुकसानग्रस्तांना मिळणार 50 हजारांची मदत

Spread the love