Site icon e लोकहित | Marathi News

ऐन दिवाळीच्या तोंडावर ‘इतक्या’ रुपयांनी वाढल्या डाळींच्या किंमती, खाद्यतेलाचे दरही उंचावले

On the eve of Diwali, the prices of pulses increased by Rs

यंदाच्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या (Farmers) पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहेत. या पावसामुळे डाळीच्या पिकांचं (pulse crops) देखील अतोनात नुकसान झालं. त्यामुळे येत्या काळात डाळींचं पिकं घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे डाळींचे दर वाढण्यास आतापासूनच सुरुवात झाली आहे. दरम्यान ऐन दिवाळीच्या तोंडावर डाळींच्या किंमती वाढल्या (Prices went up) असून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसली आहे. मागच्या आठवड्यात तूर डाळ (Tur dal) चार ते पाच रुपयांनी वाढली होती. तसेच तूर डाळीसोबतच उडीद डाळ (Udid dal) आणि खाद्य तेलाच्या(edible oil) किंमतीतही वाढ झाल्याचं नोंदवण्यात आलय.

बापरे ! चक्क पाण्याची विहिरच गेली चोरीला, वाचा सविस्तर..

इतकंच नाही तर ठोक बाजारसह किरकोळ बाजारावरही डाळींच्या किंमतींचा परिणाम जाणवू लागला आहे. डाळींची दरवाढ होण्याचं महत्वाचं कारण म्हणजे उत्पादन घटण्याची भीती. सध्या तूर डाळीचा ठोक बाजारातील दर हा 110 रुपये प्रति किलो झाला आहे. तर किरकोळ बाजारात तूर डाळीची किंमत 125 ते 130 रुपये किलो इतकी झाली आहे. तसेच मागच्या आठवड्यात उडीद डाळ 97 ते 100 रुपये किलोने मिळत होती. परंतु आता ऐन दिवाळीआधी उडीद डाळीचा दर 105 ते 110 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. मात्र या वाढलेल्या दरांमुळेच थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे.

Lumpy: ‘लम्पी’ रोगाने मृत पावलेल्या जनावरांसाठी मिळणाऱ्या मदतीमध्ये शासनाने केला बदल; आता मिळणार ‘इतकी’ रक्कम

दरम्यान, खाद्यतेल देखील 3 ते 4 रुपयांनी महागलंय. इतकंच नाही तर खाद्यतेलाच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच सीएनजीसह पीएनजीच्या दरातही वाढ नोंदवण्यात आली होती. महत्वाची बाब म्हणजे सीएनजीचे दर वाढल्यामुळे भाज्या, शेतीचा माल, या सगळ्यासोबत इतर सर्व मालाची ने-आणदेखील महागली आहे. दुसरीकडे गॅस सिलिंडरच्या दरवाढीने डोकेदुखी वाढवली आहे.

ज्येष्ठ विद्यार्थ्यांना विद्यार्थिनीचा लागला धक्का, शौचालयात नेऊन केला सामूहिक बलात्कार

Spread the love
Exit mobile version