
अतिवृष्टीमुळे (heavy rain) गेल्या काही दिवसांत शेतकऱ्यांच्या पिकाचे (crop) मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई (compensation for damages) म्हणून शेतकरी (farmers) सरकारकडून काही निधी द्यावा अशी मागणी करत आहेत. परंतु तलाठ्यांनी प्रशासकीय खर्चाची रक्कम मिळत नसल्याने मदत निधी (funds) वितरणास नकार दिला होता. दरम्यान आता शेतकऱ्यांना मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या प्रकरणात विभागीय आयुक्तांनी मध्यस्थी करत तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांना समप्रमाणात गावे वाटप करण्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांना लवकरात लवकर निधी मिळावा यासाठी विभागीय आयुक्तांनी मदत वाटपाचा तिढा सोडवला आहे.
प्रियकरासोबत मिळून पत्नीने पतीची चाकूने गळा चिरून केली हत्त्या, कारण वाचून व्हाल थक्क
शेतकऱ्यांना जून ते जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानची भरपाई मिळावी यासाठी जिल्हा प्रशासनाला १२३ कोटी ६२ हजार ८८ हजार रुपयांचा निधी मिळाला आहे. मात्र हा निधी अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा झाला नाही. शेतकरी जेव्हा वारंवार नुकसान भरपाई मागायचे तेव्हा तलाठ्यांनी शासनाकडून वितरीत मदतीच्या ०.२५ टक्के प्रशासकीय खर्च मिळत नसल्याने तलाठ्यांनी निधी वितरण करण्यास नकार दिला होता.
खुशखबर! शेतकऱ्यांना सिंचनासाठी मिळणार निधी; राज्य सरकारने घेतला महत्वाचा निर्णय
मात्र आता याप्रकरणी विभागीय आयुक्तांनी विदर्भ पटवारी संघांची बैठक घेतली. या बैठकीत तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांना समप्रमाणात गावे वाटून देण्यात यावी व मदतीच्या ०.२५ टक्के प्रशासकीय शासनाकडून प्राप्त होताच खर्च तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांना वितरीत करण्यात यावा असे आदेश दिले आहेत. सदर आदेश जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झाला आहे. त्यामुळे आदेशानुसार त्याची अंमलबजावणी करण्याचे काम प्रशासकीय स्तरावर सुरु झाले आहे.