इंग्लंडमधील लंडन येथील ओव्हल स्टेडियम (Oval stedium) मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा (WTC) शेवटचा सामना खेळला जात आहे. या मॅचमध्ये भारताने टाॅस जिंकून पहिल्यांदा बाॅलींगचा निर्णय घेतला आहे. मोहम्मद सिराजने (Mohammad siraj) टीमला उत्तम सुरूवात करून दिली. त्याने उस्मान ख्वाजाला (Usman Khwaja) आऊट केले. मोहम्मद नेहमीच कांगारूंनवर वरचढच राहीला आहे.
टीम इंडियाचा फास्ट बॉलर सिराजचा एक बाॅल येवढा भयानक होता की, मार्नस लाबुशेन (Marnas labuahen) अक्षरशः जखमी झाला, आणि त्याच्या हातामधून बॅट सटकून खालीच पडली होती. सिराजने टीम इंडियाला खूपच उत्तम सुरूवात दिली. ऑस्ट्रेलियाचा बॅट्समन उस्मान ख्वाजाला त्याने आउट करत सिराजला पहिली विकेट मिळाली. ख्वाजाने एकही रन न काढता तो परतला. दरम्यान सिराज मार्नस लाबुशेनीशी भिडला. त्या दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली.
“मी शहराला छत्रपती संभाजीनगर नाही तर औरंगाबादच म्हणणार” – शरद पवार
सिराजने 143 च्या स्पीडने बाॅल टाकला. तो बाॅल लाबुशेनच्या अंगठ्याला जाऊन जोरदार लागला. परंतु जखम फार गंभीर नव्हती. त्यामुळे त्याने पुन्हा खेळण्यास सुरुवात केली. नंतर सिराज त्याच्यापाशी गेला आणि सिराजने त्याच्याशी संवाद साधला. त्या दोघांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. मग त्यानंतर पुन्हा मॅच चालू झाली. यावेळी फॅन्स म्हणाले, “हे क्रिकेट आहे का WWE आहे का? अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.”
मुंबईच्या वसतिगृहातील तरुणीसोबत घडलेल्या प्रकराबाबत अजित पवारांची प्रतिक्रिया; म्हणाले…
Mohammad Siraj on fire 🤯🥵#WTCFinal2023 | #Siraj | pic.twitter.com/Tsr1ijA4fM
— Cricket Fort (@CricketFort) June 7, 2023