
Manoj Jarange Patil । जालना : मराठा समाजाच्या आरक्षणाचा (Maratha Reservation) पेच अजूनही सुटला नाही. राज्य सरकारकडून आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु आहेत. मराठा आरक्षणाचा लवकरात लवकर निर्णय घ्या, त्याशिवाय आंदोलन (Maratha Reservation Protest) मागे घेतले जाणार नाही, असा पवित्रा जरांगे पाटील यांनी घेतलेला आहे. आज त्यांच्या उपोषणाचा १५ वा दिवस असून त्यांची प्रकृती ढासळत चालली आहे. (Latest Marathi News)
राज्यातील सर्व मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, अशी जरांगे पाटील यांची मुख्य मागणी आहे. मागणी मान्य होत नसल्याने त्यांनी रविवारपासून औषध आणि पाणी त्यागल आहे. त्यामुळे त्यांची तब्येत बिघडत चालली आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी त्यांना उपचार घेण्याचा आग्रह केला होता. अखेर त्यांच्या आग्रहाखातर त्यांनी सलाईन घेतली आहे.
Maratha Reservation | आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! आरक्षण देण्यास सरकार तयार पण…
निर्णय घेण्यास सरकारला वेळ का लागतोय?
ते आज सकाळी 10 वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत आणि दुपारी दोन वाजता सर्व समाजबांधवांसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकीत ते मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राज्य सरकारने योग्य कारण दिले तर आम्ही चार पाऊले मागे येऊ. पण सरकारला निर्णय घेण्यास वेळ का लागत आहे? असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला आहे.
Riots in Satara । धक्कादायक! वादग्रस्त पोस्टच्या वादातून दंगल, एकाचा मृत्यू तर एकजण गंभीर जखमी
आरक्षणासंबधी नेमली समिती
काल सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं,मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेतले जातील. आरक्षणासंबधी अॅड. शिंदे यांची समिती नेमली आहे. त्यात जरांगे पाटील यांच्या प्रतिनिधीने यावे, असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले आहे.
Manoj Jarange । अजित पवार यांना मनोज जरांगेंचं आवाहन; म्हणाले ‘पवारांनी चार-पाच…’