धुलिवंदनानिमित्त जावयाची गाढवावर बसून काढली जंगी मिरवणूक

On the occasion of Dhulivandan, the son-in-law took out a procession on a donkey

राज्यात मोठ्या उत्साहात होळी आणि धुलिवंदन साजरे केले जात आहे. यामध्ये सामान्य लोकांपासून ते कलाकार आणि राजकीय नेते सर्वचजण धुलिवंदन साजरी करताना दिसत आहेत. दरम्यान धुलिवंदनानिमित्त बीडच्या केज तालुक्यातील विडा गावात जावयाची गाढवावर बसून मिरवणूक काढण्यात आली आहे. माहितीनुसार, यावर्षी हा मान केज तालुक्यातील जवळबन येथील जावयाला मिळाला आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर निशाणा; म्हणाले, “…पण काही लोक ३६५ दिवस शिमगा करतात”

मागच्या 91 वर्षांपासून ही प्रथा चालू असून धुलीवंदनाच्या दिवशी जावयाची गाढवावरून मिरवणूक निघते. यावर्षी देखील अविनाश करपे या जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्यात आली आहे.

चर्चा तर होणारच! हौशी बापाने मुलाच्या वाढदिवसानिमित्त वेरना कारचा केक बनवला; केकचे वजन तब्बल…

सध्या या आगळ्यावेगळ्या प्रथेची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चर्चा होताना दिसत आहे. थट्टा मस्करीत सुरू झालेली ही प्रथा जणू आता या गावची संस्कृतीच बनली आहे. ही आगळीवेगळी परंपरा दरवर्षी साजरी केली जाते.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकाचे लवकरात लवकर पंचनामे करा; एकनाथ शिंदे यांचे निर्देश

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *