दसऱ्याच्या मुहर्तावर ग्रामीण भागात कापूस (Cotton) खरेदीला व्यापाऱ्यांकडून (merchants) प्रारंभ करण्यात येतो. त्यामुळे यावेळी शेतकऱ्यांचे (Farmers) कापसाला नेमका किती भाव जाहीर होणार याकडे लक्ष लागलेले असते. दरम्यान यंदाच्या वर्षी दसऱ्याच्या (Dasara) मुहर्तावर कापूस उत्पादक शेतकरी आनंदी आहेत. कारण कापूस खरेदीला (buy cotton) शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळाला आहे.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! ‘या’ तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळणार 22 कोटींची नुकसान भरपाई
औरंगाबादच्या (Auragabad) कापसाच्या खरेदीला प्रारंभ
यांदाच्या वर्षी दसऱ्याच्या मुहर्तावर व्यापाऱ्यांकडून औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील बनकिन्होळा परिसरातील कापसाच्या मोठ्या बाजारपेठेतून कापूस खरेदीला प्रारंभ करण्यात आला. दरम्यान या बाजारपेठेतून कापसाला 11 हजार रुपये प्रति क्विंटल प्रमाणे भाव मिळाला आहे. यावेळी व्यापारी संतोष फरकाडे व दत्ता काकडे यांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर 11 हजार रुपये प्रति क्विंटल दराने कापसाची खरेदी केल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे.
Chandgaon: चांडगावमध्ये नवरात्रउत्सव मोठ्या उत्साहात साजरा
पैठण (Paithan) तालुक्यात साडेसात हजारांचा भाव
तसेच दसऱ्याच्या मुहूर्तावर पैठण तालुक्यातील टाकळी अंबड व तेथील जवळच्या परिसरात विविध ठिकाणी कापूस खरेदीस प्रारंभ करण्यात आला.टाकळी अंबड येथे बुधवारी सकाळी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर वजन काट्याचे श्रीफळ फोडून विधिवत पूजन करण्यात आले. तसेच यावेळी कापसाला साधारणतः 7 हजार 700 ते 8 हजार दरम्यान प्रति क्विंटल भाव देण्यात आला. दरम्यान पहिल्याच दिवशी सुजल कृषी उद्योग वतीने 10 क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. महत्वाची बाब म्हणजे मागील वर्षी शेवटच्या टप्प्यात याच भागात कापसाला 10 हजाराहून अधिक भाव मिळाला होता.
मोठी बातमी! दुर्गा विसर्जनादरम्यान पुरात 8 जण बुडाले तर 40 लोक बेपत्ता
कापसाची आवक घटणार
यावर्षीच्या सुरुवातीपासूनच पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं तर काही ठिकाणी पिकं पिवळी पडली. त्यामुळे यावर्षी कापसाची आवक घटण्याची शक्यता आहे. महत्वाची बाब म्हणजे जर कापसाची आवक घटली तर कापसाला निश्चीतच भाव चांगला मिळू शकतो. परंतु जर कापसाला भाव जास्त मिळाला आणि तरीदेखील कापसाचे पिक घटले तर शेवटी शेतकऱ्यांचे नुकसानच होणार आहे.
ओल्या कापसाला कमीच भाव
यावर्षी राज्यात अतिवृष्टी सगळीकडेच झाली. दरम्यान राज्यासह मराठवाड्यातील देखील अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे. इतकंच नाही तर अनेक भागात पावसाची रिपरिप ऐन कापूस वेचणीलाच झाली. त्यामुळे कापूस पुर्णपणे ओलसर झाला आहे. त्यामुळे प्रतवारी पाहून कापसाला भाव देण्यात येतो. महत्वाची बाब म्हणजे कापूस ओला झाल्यावर त्याचे वजन जास्त भरतो, पण त्याला मात्र भाव कमी मिळतो. दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या वेचणीतील कापूसाचे वजन जास्त आहे. कारण तो कापूस ओला आहे.