मकरसंक्रांत (Makar Sankrant) म्हंटल की लोक पतंग ही उडवणारच. मात्र राजस्थानमधील एक गाव असं आहे की ज्याठिकाणी पतंग उडविण्यास बंदी आहे. राजस्थानातील (Rajasthan) उदयपूर या ठिकाणी मकर संक्रांतीनिमित्त पतंग उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे.
भारतीय क्रिकेट विश्वावर शोककळा! क्रिकेट संघातील ‘या’ महत्त्वाच्या खेळाडूचा मृत्यु
राजस्थानातील उदयपूर (Udaipur) या ठिकाणी पाच पेक्षा अधिक लोकांनी पंतग उडवण्यासाठी एकत्र येऊ नये यासाठी इथं १४४ कलम लागू करण्यात आला आहे. माहितीनुसार, पतंग उडवल्यामुळे दुचाकीचालक आणि पक्षी यांना मोठ्या प्रमाणात इजा पोहचली जाते म्हणून या गोष्टीचा विचार करून शहरात पतंग उडविण्यास बंदी घालण्यात आली आहे.
बारामतीमधील अल्पवयीन मुलांना गाडी चालवायला दिल्याने पोलिसांकडून थेट पालकांवरव कारवाई
पतंगांच्या मांज्यामध्ये धातूमिश्रीत (Metallurgical) पदार्थांचा जास्त वापर केला जातो. आणि तो शरीरासाठी घातक ठरतो म्हणून राजस्थानातील उदयपूर या ठिकाणी पतंग उडवण्यास बंदी घालण्यात आली आहे. अशी माहिती उदयपूरचे अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रभा गौतम (Prabha Gautam) यांनी दिली
शिक्षकांना ‘सर’ ‘मॅडम’ संबोधने होणार बंद; सरकारचा मोठा निर्णय!