
लखनऊ : शुक्रवारी जारी केलेल्या एका सरकारी निवेदनानुसार, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांनी रक्षाबंधनानिमित्त रोडवेज बसच्या सर्व श्रेणीतील महिलांसाठी मोफत बस प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत.
उत्तर प्रदेश सरकारने रक्षाबंधनाच्या निमित्ताने महिलांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. उत्तर प्रदेश सरकारने उत्तर प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सर्व बसमध्ये महिलांना मोफत प्रवास करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी रक्षाबंधनाच्या निमित्ताने रोडवेज बसच्या सर्व श्रेणीतील महिलांसाठी मोफत बस प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले आहेत.
‘आझादी के अमृत महोत्सवा’साठी ४८ तास मोफत बससेवा उपलब्ध असेल, असे राज्य सरकारच्या प्रवक्त्याने सांगितले. 10 ऑगस्ट रोजी रात्री 12 ते 12 ऑगस्ट रोजी रात्री 12 या वेळेत महिलांसाठी मोफत बससेवा उपलब्ध असेल, असे देखील त्यांनी सांगितले.