‘टाईमपास’ हा मराठी चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटामधील कलाकार लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. यामध्येच या चित्रपटातील ‘दगडू’ म्हणजेच अभिनेता प्रशमेश परब हा सर्वांचा आवडता कलाकार. प्रशमेश परब हा सोशल मीडियावर कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत चर्चेत असतो.
भाजपचं टेन्शन वाढलं! पुणे लोकसभा पोटनिवडणूक काँग्रेस लढणार
प्रथमेश त्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत नेहमीच चाहत्यांच्या संपर्कात राहतो. प्रथमेश नुकताच ‘टकाटक २’, ‘ढिशक्यांव’ सारख्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. दरम्यान, प्रथमेशने आता त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. प्रथमेश लवकरच ‘जय श्रीराम’ या चित्रपटात महत्वपुर्ण भूमिकेत दिसणार आहे.
आत्तापर्यंत झालेल्या चित्रपटामध्ये प्रथमेशने शक्यतो नेहमी कॉलेजमधील मुलांची भूमिका साकारली आहे. आता प्रथमेश वेगळ्याच भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे प्रेक्षक देखील या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अमेय खोपकर यांच्या आगामी ‘जय श्रीराम’ या चित्रपटात तो मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
“मुलगा चेंगरला तरीही आंटी डान्स करण्यात मग्न…” पाहा व्हायरल Video
प्रथमेशने याबाबत इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत त्याने त्याच्या चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. प्रथमेशने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या फोटोमध्ये तो जय श्री राम नावाची पती घेऊन उभा आहे. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होते आहे. प्रथमेशला वेगळ्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते देखील मोठ्या प्रमाणात उत्सुक आहेत. यासाठी चाहते त्याला शुभेच्छा देखील देत आहेत.
संभाजीराजे छत्रपतींच्या पत्नीच्या पोस्टने उडाली खळबळ! पाहा नेमकं काय म्हंटलय पोस्टमध्ये?