
केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना (Shivsena) हे नाव व धनुष्यबाण पक्षचिन्ह शिंदे गटाला दिले आहे. यानंतर शिंदे गटाने अंतर्गत पक्षबांधणीसाठी पाऊले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना पक्षाच्या कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक होणार आहे. ही बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली होणार असून ताज प्रेसिडेंट हॉल मध्ये आज सायंकाळी 7 वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
ब्रेकिंग! देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी बॉम्ब ठेवल्याच्या फोन; उडाली खळबळ
आजच्या या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेचे प्रमुखपद स्वीकारतील अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. या बैठकीसाठी शिवसेना पक्षातील सर्व आमदार, खासदार व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेच्या नव्या वाटचालीसाठी ही बैठक महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शिवसेना पक्षासंबंधित अनेक महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेतले जातील.
सोनू निगमचा जीव थोडक्यात वाचला; कार्यक्रमादरम्यान झाली धक्काबुक्की
दरम्यान ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. यासंबंधी आज ठाकरे गटाकडून ( Thackeray Group) याचिका दाखल करण्यात येणार असून कदाचित आजच यावर सुनावणी देखील होईल. कोणताही अर्ज न करताच काल (ता.20) काल ठाकरे गटाने न्यायालयात सुनावणीसाठी विनंती केली होती. यावरून ठाकरे गटाला सुप्रीम कोर्टाकडून फटकरण्यात आले होते.
माजी राज्यपालांनी उद्धव ठाकरेंची लायकी काढली; म्हणाले, “ही व्यक्ती मुख्यमंत्रीपदी बसण्याच्या…”