मुंबई : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जून ते ऑगस्ट या महिन्यांमध्ये पाऊस खूप मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे खूप नुकसान झाले. याच पार्शवभूमीवर अतिवृष्टीग्रस्तांना मुख्यमंत्र्यांनी मदतीची घोषणा केली होती आणि त्यानुसार या नुकसानीच्या मदतीचा जीआर काढण्यात आल्याची माहिती राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.
सर्दी – खोकला झालाय? मग करा ‘हे’ घरगुती उपयोग, मिळेल झटपट आराम
कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी सांगितले की येणाऱ्या \ दोन ते तीन दिवसांच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास सुरुवात होईल. या जीआरचे वैशिष्ट्य म्हणजे थोडक्यात यामध्ये ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे त्यांना जो दर ठरवला होता त्यापेक्षा जास्त रक्कम देण्यात येईल असे नमूद करण्यात आले आहे.
Pune: पुण्यात गणेश विसर्जनासाठी चंद्रकांत पाटील आणि आदित्य ठाकरे आले समोरासमोर, नेमक घडलं तरी काय?
शासन निर्णयानुसार, आधी दोन हेक्टरच्या मर्यादेत सहा हजार आठशे रुपये प्रति हेक्टर एवढी मदत देण्यात येत होती. आणि जर बागायत पिकांचा विचार केला तर बागायत पिकांच्या नुकसानीसाठी तीन हेक्टर मर्यादेमध्ये 27 हजार रुपये प्रतिहेक्टर देण्यात येणार आहेत. 10 ऑगस्टला झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये ज्या शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या मोबदलापेक्षा दुप्पट भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याचबरोबरआता या निर्णयानंतर त्यासंबंधीचा जीआर काढण्यात देखील आला आहे. त्यामुळे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळेल.