Site icon e लोकहित | Marathi News

प्रदेशाध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याने स्पष्ट सांगितले

Sharad Pawar

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) मागील काही दिवसांपासून हालचाली सुरु आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी एका कार्यक्रमादरम्यान खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि प्रफुल्ल पटेल यांना कार्यकारी अध्यक्ष पद तसेच इतरांनादेखील वेगवगेळ्या जबाबदाऱ्या दिल्या होत्या. परंतु विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांना कोणतीच जबाबदारी दिली नसल्याने ते नाराज असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. (Latest Marathi News)

एकनाथ शिंदे यांनी सांगितला शरद पवारांचा ‘तो’ किस्सा म्हणाले, ‘राजकारणाचा आखाडा …’

असे असताना मागील काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात अजित पवार यांनी आपल्याला विरोधी पक्षनेते पद नको, तर पक्षाच्या संघटनात्मक बांधणी विषयी जबाबदारी देण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीवरून त्यांची नाराजी उघड झाली. सध्या राजकीय गोटात राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यपदासाठी अजित पवार तर विरोधी पक्षनेतेपदासाठी धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या नावाची चर्चा आहे.

भाजपला सर्वात मोठा धक्का! शेकडो कार्यकर्त्यांनी केला ठाकरे गटात प्रवेश

आता याच पार्शवभूमीवर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी एक वक्तव्य केले असून अजित पवार यांनी 2024 ला मुख्यमंत्री व्हावं आणि प्रदेशाध्यपद सांभाळावं, अशी माझी इच्छा आहे. राष्ट्रवादी मुख्यमंत्री होण्यासाठी आणि पक्षात कडक शिस्त लागावी यासाठी अजित पवार यांना प्रदेशाध्यक्ष करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. परंतु आता पक्ष काय निर्णय घेतो याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

सर्वात मोठी बातमी! संपुर्ण राज्यात पुढील ५ दिवस तुफान पाऊस बरसणार; ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट

Spread the love
Exit mobile version