Site icon e लोकहित | Marathi News

नाशिकमध्ये ठाकरे गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का! सहा बड्या नेत्यांसह शेकडो कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

Once again a big blow to the Thackeray group in Nashik! Hundreds of activists including six big leaders entered the Shinde group

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेसोबत बंडखोरी केली आणि भाजपसोबत युती करून राज्यात नवीन सरकार स्थापन केले. नंतर ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले. यांनतर ठाकरे गटाला चांगलीच गळती लागली. अनेक नेत्यांनी पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला. दरम्यान ठाकरे गटाला नाशिकमध्ये धक्का बसला आहे.

पूजा करताना वडाच्या झाडाने घेतला पेट; महिलांची उडाली धावपळ

नाशिकच्या सुरगाणा नगरपंचायतमधील सहा नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्याचबरोबर नवी मुंबईतील पदाधिकाऱ्यांनी देखील शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुठे कमी पडला? अजित पवारांनी डायरेक्ट कॅमेऱ्यासमोरच सांगितलं

एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी ट्विटरवर काही फोटो शेअर करत लिहिले की, “नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा नगरपंचायतीच्या सहा नगरसेवकांसह नवी_मुंबईतील माथाडी कामगार नेते ऋषीकांत शिंदे यांच्यासह त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी काल शिवसेनेत जाहीर प्रवेश केला” या पक्षप्रवेशामुळे उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे.

ओडिशा ट्रेन अपघातामुळे मृत्यूचे तांडव, ट्रेनचे अवशेष हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू…

Spread the love
Exit mobile version