पुणे( Pune) शहरात मागील काही दिवसांपासून कोयता गँगचे कारनामे वाढले आहेत. लोकांमध्ये दहशत पसरवण्यालासाठी तरुण मुलांची टोळी तोडाफोडीचे प्रकार करत आहे. यासाठी कोयता व तलवारी यांसारखी धारदार हत्यारे वापरली जात आहेत. अनेक घटना झाल्यानंतर पोलिसांनी या गँगमधील तरुणांचा तपास करून शिक्षा देखील दिली आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत देखील याबाबत मुद्दा मांडला होता.
पुणे जिल्ह्यात लम्पीच्या लसींचे उत्पादन होणार; देशात सर्वप्रथम पुण्यालाच मिळाली संधी!
दरम्यान कोयता गँगवर (Koyta Gang) कारवाई करण्यासाठी पोलीस मध्यंतरी चांगलेच दक्ष झाले होते. मात्र तरीदेखील पुणे येथील अजम कॅम्पस ( Ajam Campus) परिसरात तरुणांनी कोयता हातात घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. हा प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून पाच ते सहा जणांनी हॉटेलमध्ये घुसून कोयत्याने तोडफोड केल्याचे यामध्ये दिसत आहे.
Amruta Fadanvis: अमृता फडणवीस यांचं नवीन गाणं रिलीज
या पार्श्वभूमीवर लष्कर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे तरुण हॉटेलमध्ये बसले असता हॉटेलमालकांनी हटकल्यामुळे राग मनात ठेऊन या मुलांनी दुसऱ्या दिवशी हा प्रकार केला आहे. यावेळी त्यांनी हॉटेलमध्ये जाऊन कोयत्याने तोडफोड तर केलीच वरून हॉटेल मालकाला देखील धमकावले आहे. याबाबतची माहिती पोलिसांनी दिली असून घटनेतील आरोपींना अटक करण्यात आली आहे.