Site icon e लोकहित | Marathi News

रेल्वेचा पुन्हा एकदा सर्वात मोठा अपघात! एका मालगाडीची दुसऱ्या मालगाडीला जोरदार धडक, 12 डब्बे रेल्वे रुळावरून घसरले..

Once again the biggest train accident! A freight train collided with another freight train, 12 coaches derailed.

मागच्या काही दिवसापूर्वी ओडिशातील बालासोर येथील रेल्वे अपघाताची घटना घडली. या घटनेने संपूर्ण देशाला हादरून टाकले. या घटनेमध्ये अनेक जणांचा मृत्यू देखील झाला. या घटनेतून लोक सावरत होते तोच आणखी एक भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. पश्चिम बंगालच्या बांकुडा या ठिकाणी ही दुर्घटना घडली आहे.

पाहिल्यात पावसात मुंबईमध्ये गाडयांना रस्सीने बांधण्याची वेळ; महिलाही वाहून गेली, पाहा धक्कादायक व्हिडीओ

माहितीनुसार, रेल्वे रुळावर उभ्या असलेल्या मालगाडीला समोरून येणाऱ्या मालगाडीने जोरदार धडक दिली. आणि हा भीषण अपघात झाला आहे. ही धडक एवढी भीषण होती की मालगाडीचे 12 डब्बे रेल्वे रुळावरून घसरले. माहितीनुसार, या अपघातामध्ये कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही. मात्र, दुसऱ्या मालगाडीचा मोटरमन जखमी झाला झाल्याची माहिती मिळाली आहे.

दर्शना पवार हत्याकांड; आरोपी राहुल हंडोरे याच्यावरच संशय का आला?, ‘ती’ चूक भोवली अन्… वाचून व्हाल थक्क

आज पहाटे 4 वाजता हा भीषण अपघात झाला आहे. एक मालगाडी बांकुराहून बिष्णूपूर येथे जात होती. त्यावेळी ओंदा रेल्वे स्टेशनवरील रेल्वे रुळावरील लूप लाइनवर आणखी एक मालगाडी उभी होती. त्यावेळी उभा असलेल्या मालगाडीच्या दुसऱ्या मालगाडीचे जोरात धडक बसली आणि हा भीषण अपघात झाला. या रेल्वे अपघाताचा एक व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे.

OPPO A78 4G । Oppo चा नवीन फोन लवकरच होणार लॉंच, ‘हे’ असतील धमाकेदार फिचर; जाणून घ्या सविस्तर

Spread the love
Exit mobile version