गौतमी पाटीलला महाराष्ट्रात कोण ओळखत नाही असं शोधूनही सापडणार नाही. खूप कमी वेळामध्ये गौतमी प्रसिद्धीच्या झोतात आली. मागच्या काही दिवसापूर्वी गौतमी पाटीलचा (Gautami Patil) एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता. गौतमी पाटील चेंजिंग रूम मध्ये कपडे बदलत असतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. याबाबत पोलिसांत तक्रार करण्यात आली असून गुन्हेगार अद्याप पकडण्यात आलेला नाही. दरम्यान, व्हिडीओ व्हायरल झाल्यांनतर गौतमीची काय अवस्था झाली होती हे तिने एका युट्युब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले आहे.
कीर्तनकार महाराजांनी ‘त्या’ गरम तव्यावर बसणाऱ्या बाबाची प्रात्यक्षिक करत पोलखोल केली!
याबाबत बोलताना गौतमी बोलताना म्हणाली, “जेव्हा पहिल्यांदा मी व्हिडीओ पहिला तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. व्हिडीओ पाहून मला काय करावं काहीच समजत नव्हतं. आता सगळ संपल आयुष्यात काहीच राहील नाही असं मला वाटू लागल” असं गौतमी म्हणाली आहे.
ब्रेकिंग! प्रसिद्ध कोरियन अभिनेत्रीचा मृत्यू; वयाच्या अवघ्या २६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
त्याचबरोबर ती पुढे म्हणाली, “मला काय करू काहीच सुचत नव्हतं हा व्हिडीओ पहिल्यांदा माझ्या आईला पाठवला कारण हा व्हिडीओ जर आईला कोणी दुसऱ्याने पाठवला तर तिला धक्का बसला असता. म्हणून तिला कल्पना देण्यासाठी मीच तिला तो व्हिडीओ पाठवला असल्याचं गौतमी गौतमीने सांगितले हे सर्व सांगत असताना तिला अश्रू अनावर झाले.
अजित पवार खरंच भाजपासोबत जाणार का? सुप्रिया सुळे म्हणाल्या, “पाऊस पडेल…”