बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यू; ऐन दिवाळीत कुटुंबावर पसरली शोककळा

One and a half year old girl dies in leopard attack; On Diwali, mourning spread over the family

मुंबई: मुंबईतील (Mumbai) गोरेगावमधील आरे कॉलनीत (Aarey Colony) दीड वर्षाच्या मुलीवर बिबट्याने (Leopard Attack) हल्ला केला आहे. दरम्यान या हल्ल्यात मुलीला (girl) प्राण गमवावे लागले आहे. बिबट्याने हा हल्ला आज सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास केला. आरे कॉलनीमधील युनिट क्रमांक 15 मध्ये ही घटना घडली. दरम्यान या घटनेमुळे ऐन दिवाळीत कुटुंबांवर आणि परिसरावर दुःखाचा डोंगर पसरला आहे. इतिका लोट (itika lot) असे या दीड वर्षीय मुलीचे नाव आहे.

 …तर सरपंच, सदस्य, ग्रामसेवक यांचे पद रद्द होणार; काय आहे कारण?

नेमकी घटना कशी घडली ?

ही दीड वर्षाची मुलगी आपल्या आईसह दिवाळीचे दिवे (Diwali lights) लावण्यासाठी सकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास घराबाहेर आली होती. दरम्यान दिवे लावल्यानंतर या दोघी मायकेली घरामध्ये जात असताना बिबट्याने मागून येऊन या दीड वर्षाच्या मुलीवर हल्ला केला. बिबट्या हल्ला करताना इतिकाची आई घरात गेली होती. खूपवेळ झाला तरी इतिका घरात का यायना म्हणून तिच्या कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. त्यानंतर तिचा मृतदेह (dead body) जंगलात आढळला. बिबट्याच्या हल्ल्यात तिचा दुर्देवी मृत्यू झाला. दरम्यान या चिमुकली इतिकाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गोरेगावमधील सिद्धार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. पोलीस आणि वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

भारताकडून झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानची भलतीच रडारड सुरू, ट्विटरवर #Cheating असा हॅशटॅग केला व्हायरल

आरे कॉलनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा एक भाग

आरे कॉलनीत याआधीदेखील बिबट्याने हल्ले केले आहेत. दरम्यान आरेत पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्यात दीड वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याने बिबट्याचा अधिवास आणि मानवी वस्ती या मुद्यावर पुन्हा चर्चा होण्याची शक्यता आहे. महत्वाची बाब म्हणजे आरे कॉलनीचा भाग हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा एक भाग असल्याचे सांगितले जाते. दरम्यान मुंबई मेट्रो-3 च्या कारशेड काम सुरू असलेल्या ठिकाणी बिबट्याचे नैसर्गिक अधिवास असलेले ठिकाण असल्याचा दावा पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येतो.

धक्कादायक! नातेवाईकानीच चार वर्षांच्या मुलाची अपहरण करून केली हत्या

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *