कित्येक आईबाप आपली राहिलेली स्वप्न आपल्या मुलांच्या डोळ्यांध्ये पाहत असतात. ती पूर्ण करण्यासाठी ते अहोरात्र कष्ट करतात. आपल्याला ज्या गोष्टी अनुभवता आल्या नाहीत त्या आपल्या मुलांनी अनुभवाव्यात यासाठी पालक कायम प्रयत्नशील असतात. अगदी अशिक्षित पालक सुद्धा पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी काम करून खस्ता खात पैसे कमावत असतात. मात्र जेव्हा मुलं या पालकांच्या कष्टाला जागून काहीतरी करून दाखवतात. तेव्हा हे पालक सुखावतात. हिंगोली ( Hingoli) जिल्ह्यातील साहेबराव भूरके यांच देखील असच काहीसं झालं आहे.
तालुकास्तरिय क्रीडा स्पर्धेत खडकी शाळेची चमकदार ‘कामगिरी’
साहेबराव भुरके ( Sahebrao Bhurke ) व त्यांची पत्नी ऊसतोड कामगार असून या दोघांनी अतिशय कष्टाने आपल्या मुलींना शिक्षण दिले. या मुलींनी देखील मोठे यश मिळवत इतिहास रचला आहे. त्यांना तीन मुली असून या तीनही मुलींनी ( Three Inspirational girls) आपल्या आई वडिलांची मान उंचावली आहे. साहेबराव भुरके यांची मोठी मुलगी राणी साहेबराव भुरके हिने नांदेड येथून एमजीएम महाविद्यालयात अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे. सध्या ती अभियंता बनली आहे. त्यांची दुसरी मुलगी मोनिका 2020 -21 मध्ये नांदेड येथील एमबीबीएस कॉलेजसाठी पात्र ठरली असून मेडिकलचे शिक्षण घेत आहे. तर तिसरी मुलगी सोनम लातूर येथील एमबीबीएस कॉलेज साठी पात्र ठरली आहे.
एकाच व्यासपीठावर शंभुराज देसाईंच्या कानात सुप्रिया सुळेंनी केली कुजबुज
अशिक्षित असणाऱ्या साहेबराव यांच्या तिन्ही मुलींनी मिळवलेले हे यश वाखानण्याजोगे आहे. अशिक्षित आईवडील, घरची हलाखीची परिस्थिती, महाग झालेलं शिक्षण आणि समाजाकडून मिळणारी हीन वागणूक यातून मार्ग काढत या मुलींनी हे यश मिळवले आहे. आज आजूबाजूच्या गावात या कुटुंबाची चांगलीच चर्चा होत असते. आपल्या या यशामागे आई- वडिलांचे कष्ट व विश्वास आहे असे या मुली सांगतात. या तिन्ही मुलींनी ‘मुलगी शिकली,प्रगती झाली’ हे वाक्य खरे ठरवले आहे.
पाकिस्तानसह नेपाळ आणि बांगलादेशमध्ये दुधाला मिळतोय ‘इतका’ दर; वाचून तुम्हालाही बसेल धक्का!