Jalgaon News । पोहायला गेला तो परतला नाही, पाण्याचा अंदाज न आल्याने चिमुकल्याचा मृत्यू

Jalgaon News

Jalgaon News । जळगाव : हल्ली अनेकांचा पाण्यात बुडून मृत्यू (Death by drowning) होत आहे. अशीच एक दुर्दैवी घटना घडली आहे. पोहायला गेलेल्या चार मित्रांना पाण्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे ते गटांगळ्या खाऊ लागले. हा प्रकार आजूबाजूच्या नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी त्या मुलांना वाचवण्याचा प्रयत्न केला. नागरिकांना तीन मुलांना वाचवण्यात यश आले परंतु यात एकाचा मृत्यू झाला. (Latest Marathi News)

Chhatrapati Sambhaji Nagar Fire । मोठी बातमी! संभाजीनगर आग दुर्घटनेतील मृत कामगारांच्या नातेवाईकांना मिळणार 5 लाखांची मदत

ही दुर्दैवी घटना जळगावमध्ये (Jalgaon) घडली आहे. शहरातील मेहरुण तलाव (Mehrun Lake) परिसरात चौघेजण अंघोळीसाठी गेले होते. चारही जण पाण्यात उतरले, परंतु त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही, (Death) त्यामुळे ते खोल पाण्यापर्यंत पोहचले. काही क्षणातच ते चौघेजण गटांगळ्या खाऊ लागले. आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना पाहताच क्षणी पाण्यात उडी टाकून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला.

Apple days sale । सोडू नका अशी संधी! iPhone 15 वर मिळतेय थेट 30 हजारांची सवलत

या घटनेची माहिती मिळताच संबंधित मुलांच्या पालकांनी आणि नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. चारही जणांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात नेले. परंतु, डॉक्टरांनी एकाला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृत मुलाचे वडील पेंटर असून आई गृहिणी आहे. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा होता.

Crime News । पोलिसांची मोठी कारवाई, ड्रग्जसह रेव्ह पार्टीतून 100 जणांना घेतले ताब्यात

Spread the love