राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत एकाचा मृत्यू; वाचा सविस्तर माहिती

One dies in Rahul Gandhi's Bharat Jodo Yatra; Read detailed information

काँग्रेसची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात दाखल झाली आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली भारत जोडो यात्रा सुरू असून ही यात्रा सध्या नांदेड मधून जात आहे. काल रात्री या यात्रेत ट्रकच्या धडकेने एका कार्यकर्त्याचा दुर्दैवी मृत्यु झाला. यामुळे अगदी व्यवस्थित सुरू असणाऱ्या ‘भारत जोडो’ यात्रेला ( Bharat Jodo Yatra) गालबोट लागले आहे.

शिर्डी: साईबाबा भक्तांसाठी आनंदाची बातमी; आता थेट साईबाबांच्या समाधीला हात लावून घेता येणार दर्शन

नवीन मोंढा परिसरातील सभा झाल्यानंतर यात्रा महादेव पिंपळगाव कॅम्पकडे रवाना होत असताना, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काल ( दि.10) रात्री 9 वाजता भरधाव येणाऱ्या ट्रक ने भारत जोडो यात्रेमधील दोघांना जोराची धडक दिली. गणेशन( 62) आणि सययुल (30) ही या अपघातग्रस्तांची नावे आहेत. हे दोघेही तामिळनाडूचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. यातील गणेशन याचे उपचारादरम्यान निधन झाले आहे व सययुल यांच्यावर उपचार सुरू आहेत.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मिला सीतारामन यांच्या दौऱ्याच्या पूर्वतयारीसाठी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल बारामतीत दाखल! हर्षवर्धन पाटील यांनी स्वागत केले

या अपघाताची माहिती समजताच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण ( Ashok Chavhan) व आमदार रोहन हंबर्डे यांनी रुग्णालयात जाऊन अपघातग्रस्तांची चौकशी केली. इतकेच नाही तर हे दोघेही रात्री उशिरापर्यंत रुग्णालयात थांबले होते. तळागाळातल्या भारतापर्यंत पोहोचण्यासाठी सुरू असलेली ही ‘भारत जोडो यात्रा’ लवकरच पुढे प्रस्थान करेल. दरम्यान ही घटना( Accident in Bharat jodo yatra) घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

काय सांगता! घरात मांजर पाळायचे तर पालिकेची परवानगी घ्यावी लागणार

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *