बिहार राज्यात ( Bihar State) जातीनुसार जनगणना करणे सुरू आहे. या जनगणनेनिमित्त वेगळीच माहिती समोर येत आहे. जनगणनेदरम्यान समोर आलेल्या धक्कादायक माहितीनुसार, अरवल जिल्ह्यातील ४० महिलांचा पती एकच व्यक्ती असल्याचे समोर आले आहे. या व्यक्तीचे नाव रूपचंद असे आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या महिला एका शेजारी एक राहतात. सर्वेक्षण ( Survey) करणारे अधिकारी देखील हे पाहून थक्क झाले आहेत.
Rishabh Pant: ऋषभ पंतच्या चाहत्यांसाठी समोर आली धक्कादायक बातमी
अरवलच्या नगर परिषद परिसरातील प्रभाग क्रमांक ७ मध्ये एक रेड लाईट परिसर आहे. ( Red Light area in Arwal) या भागात गेली कित्येक वर्षे महिला सेक्स वर्कर म्हणून काम करत आहेत. जनगणना करणारे सरकारी कर्मचारी घरोघरी फिरत असताना ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथील जनगणना सुरू असताना ४० महिलांनी आपल्या पतीचे नाव रुपचंद असे सांगितले. तर काही महिलांनी पिता पुत्र म्हणून देखील रुपचंद असेच नाव सांगितले.
‘या’ कारणामुळे उर्फी जावेदला मुंबई मधील रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाही; वाचून बसेल धक्का
खरंतर रेड लाईट परिसरात सेक्स वर्कर ( Sex Workers) म्हणून काम करणाऱ्या या महिलांची सर्वात मोठी समस्या ही आहे की, पती म्हणून कोणाचे नाव लावावे? येथील सर्व स्त्रिया रुपया म्हणजे पैशाला आपले सर्वस्व मानतात. म्हणूनच त्यांनी पतीचे नाव रुपचंद असे लिहिले. सखोल माहिती घेतल्या नंतर जनगणना करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले की, रुपचंद हा कोणताही व्यक्ती नसून पैसा आहे.
आनंदाची बातमी! घरकुल योजनेतील लोकांना मिळणार मोफत वाळू; नवीन शासन निर्णय जारी